gosekhurd  
मुख्य बातम्या

`गोसेखुर्द'चे भू-संपादन संपेना

गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ ३६ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, या प्रकल्पाकरिता आवश्‍यक भूसंपादनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही.

टीम अॅग्रोवन

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ ३६ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, या प्रकल्पाकरिता आवश्‍यक भूसंपादनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. पुन्हा नव्याने ३२ हेक्‍टर जागा संपादन करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणार केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. गोसेखुर्द प्रकल्प पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा दावा करण्यात आला होता. नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा लाभ होणार असून दोन लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ झाला होता. या प्रकल्पात नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांतील ८५ गावे विस्थापित झाली असून दोन हजार हेक्‍टरवर जमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पाला ३६ वर्षे होत असताना अद्याप याचे काम पूर्ण झालेले नाही. या प्रकल्पाच्या कामांवर आत्तापर्यंत १० हजार कोटींच्या जवळपास खर्च झाला. या प्रकल्पाच्या कामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. एसीबीमार्फत चौकशी सुरू असून अनेक अधिकारी, कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असून केंद्र सरकारमार्फतही निधी देण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे बुडीत क्षेत्र वाढणार असून कालव्याकरिता भूसंपादन करायचे आहे. त्यामुळे आता नव्याने ३२ हेक्‍टर जागा संपादित करण्यात येणार आहे. सिंचन विभागाकडून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मूळ प्रस्ताव चुकला? गोसेखुर्द प्रकल्पासाठी सर्व्हे करून आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याच्या आधारे प्रकल्पकरिता भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली. परंतु भविष्याच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक कालवे, इतर कामांसाठी जागा संपादनाचा समावेश आराखड्यात करण्यात आला नाही. त्यामुळे ३५ वर्षांनंतरही भूसंपादनाची गरज पडत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT