Katraj's ghat to five directors 
मुख्य बातम्या

पाच संचालकांना ‘कात्रज’चा घाट

पुणे ः जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारीतून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान पाच संचालकांना ‘कात्रज’चा घाट दाखविला आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे ः जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारीतून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान पाच संचालकांना ‘कात्रज’चा घाट दाखविला आहे. तर विद्यमान पाच संचालकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. दोन जागा काँग्रेसला दिल्या आहेत. अन्य आठ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र मित्रपक्ष शिवसेनेला डावलण्याची खेळीदेखील खेळली जात असल्याची चर्चा आहे. 

ज्येष्ठ संचालक रामचंद्र ठोंबरे (ता. मुळशी), बाळासाहेब ढमढेरे (ता. शिरूर), दौलत लोखंडे (ता. आंबेगाव), लक्ष्मण तिटकारे (खेड) आणि जीवन तांबे (ता. शिरूर) या पाच विद्यमान संचालकांचा पत्ता कट झाला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शुक्रवारी (ता.४) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे पॅनेल जाहीर केले. भाजपसोबत गेलेले बाळासाहेब नेवाळे (ता. मावळ) यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी दिल्याने ते स्वगृही आले आहेत. तर नवीन आठ चेहऱ्यांमध्ये राहुल दिवेकर (ता. दौंड), अरुण चांभारे (ता. खेड), कालिदास गोपाळघरे (ता. मुळशी), स्वप्नील ढमढेरे (ता. शिरूर), चंद्रकांत भिंगारे (ता. मुळशी), लता गोपाळे (ता. खेड), भाऊ देवाडे (ता. जुन्नर) आणि निखिल तांबे (ता. शिरूर) यांचा समावेश आहे. काँग्रेसला दिलेल्या जागांमध्ये पुरंदरमधून मारुती जगताप, राष्ट्रवादीचे गोपाळ म्हस्के आणि भगवान पासलकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. भोरमधून काँग्रेसचे अशोक थोपटे रिंगणात आहेत. 

  नवीन चेहेऱ्यांमध्ये यांना संधी

नवीन चेहऱ्यांमध्ये राहुल दिवेकर (ता. दौंड) कालिदास गोपाळघरे (मुळशी) स्वप्नील ढमढेरे (शिरूर) आणि भटक्या जाती, विमुक्त जमाती मतदारसंघातून जीवन तांबे यांच्याऐवजी पुतण्या निखिल तांबे, अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून विद्यमान संचालक लक्ष्मण तिटकारे यांच्याऐवजी चंद्रकांत भिंगारे आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) मतदारसंघातून विद्यमान संचालक दौलत लोखंडे यांच्याऐवजी भाऊ देवाडे (जुन्नर) यांना उमेदवारी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: उडदाचे भाव कमीच; सिताफळाला मागणी, बाजरी दबावातच, लिंबाचे दर स्थिर तर जिऱ्याचे भाव टिकून

Gujarat Farmer Relief Package: गुजरातमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्री पटेल यांची घोषणा

Winter Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशनास दिली मान्यता

Soybean Procurement: कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी तीन केंद्रे

Mango Production: सातपुड्यात मुबलक आंबा उत्पादनाची अपेक्षा 

SCROLL FOR NEXT