The havoc of return rains in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात परतीच्या पावसाचा कहर

औरंगाबाद: मराठवाड्यात परतीच्या पावसाचा कहर गुरुवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासातही कायम होता.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाचा कहर गुरुवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासातही कायम होता. जालना, बीड, उस्मानाबाद व परभणी या चार जिल्ह्यातील १३ मंडळांत अतिवृष्टी झाली. नदी व ओढ्याच्या पात्राबाहेर पाणी आल्याने अनेक भाग जलमय झाले. तर, सोयाबीनच्या लावलेल्या गंजी भिजून व वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

बीड जिल्ह्यातील ५४ मंडळांत तुरळक, हलका, मध्यम दमदार ते जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील ३ मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील ३४ मंडळांत पाऊस झाला. जिल्ह्यातील २ मंडळांत अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यात २८ मंडळांत पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ३४ मंडळांत पावसाची नोंद झाली. एका मंडळात अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातील ५१ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ३३ मंडळांत हलका, मध्यम, दमदार ते जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सात मंडळांत अतिवृष्टी झाली. 

सोयाबीनच्या गंजी पाण्यात

उमरगा शहरासह तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण शिवार जलमय झाले. अनेक भागातील सोयाबीन गंजी पाण्यात अडकल्या आहेत. कोरेगाव, बेडगा, गुंजोटी, कुन्हाळी, भूसणी, गुगळगांववाडी, दगडधानोरा, आष्टा आदी मार्गावरील नाल्याच्या पुलावरुन पाणी जात असल्याने वहातूक ठप्प झाली होती. 

गुरूवारी (ता. १५) वहातुक सुरू झाली मात्र बेडगा गावाजवळील बेन्नीतूरा नदीवरील पुलावरून पाणी गेल्याने पुलावरील रस्ता धोकादायक झाल्याने वहातूक बंद आहे. अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटुन शिवार जलमय झाले. ओढे, नदी काठच्या शेतातील सोयाबीनच्या अख्या गंजी  नदीपात्रातील पाण्यावर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत तरंगत गेल्या. अनेक ठिकाणी गंजीत पाणी शिरल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उसाची स्थितीही भयावह आहे. जमिनीची मातीही वाहून गेली. तलमोड, दगडधानोरा, बेडगा, नारंगवाडी, मुरूम, दाळींब, येणेगुर याच्यासह सर्वच भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले.

" निसर्गाचा प्रकोप पाचवीला पूजलेला आहे. सोयाबीन पिकविण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. ती पावसाने पाण्यात गेली. आता पंचनामे होतील, मदत जाहीर होईल. पण, ती तुटपूंजी मदत शेतीचे नुकसानीच्या अवघ्या दहा टक्के असेल. माय - बाप शासनाने भरीव मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.  - सिद्राम भोसले, भिकार सांगवी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद

तुळजापूर. तालुक्यात अपसिंगा, तिथ॔ खुद॔, काटगाव, खानापूर यासह विविध गावातील जनावरे वाहून गेली. तहसिल कार्यालयाच्या माहितीनुसार २७ जनावरे वाहून गेली. अनेक गावामध्ये घरातील भांडी वाहून गेली. मोठं नुकसान झालं. कांद्यासारखे पीक पूर्णपणे पाण्यात गेले आहे. पीकच नाही. तर, शेतातील मातीही वाहून गेली. - नवनाथ घाटशीळे,  शेतकरी, सिंदफळ,  ता. तुळजापूर.जि. उस्मानाबाद

अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले. सोयाबिनचे सर्वाधिक नुकसान आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, त्यांनी विमा कंपनीला टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. शासन, प्रशासन स्तरावरही पिकाच्या नुकसानीचे पंचनामे होतील.  - सुनिलकुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी, उमरगा, जि. उस्मानाबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

El Nino Impact: जगावर ‘एल निनो’चे सावट गडद

Kalmodi Irrigation Project: ‘कळमोडी प्रकल्पा’च्या पाणी वापराचे फेरनियोजन

India Water Crisis: देशात मोठी धरणे निम्मी रिकामी

Agriculture Department: गैरव्यवहार तपासासाठी अधिकाऱ्याचा शोध

Global Warming Warning: जागतिक तापमानवाढीच्या वेगात वाढ

SCROLL FOR NEXT