Global Temperature Rise: जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर, २०१५ नंतर जगातील तापमान झपाट्याने वाढत असून, हा वेग आता चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. नव्या संशोधनानुसार, हीच परिस्थिती कायम राहिल्यास २०३० पूर्वीच तापमानवाढीची धोक्याची मर्यादा ओलांडली जाऊ शकते, असा धक्कादायक निष्कर्ष नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आला आहे..जर्मनीतील ‘पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च’सह विविध देशांतील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, गेल्या दशकात तापमानवाढीचा वेग इतिहासातील कोणत्याही कालखंडापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. तापमानवाढीचा दर मोजताना एल निनो, ज्वालामुखी उद्रेक, तसेच सूर्याच्या उष्णतेतील चढ-उतार यांसारख्या नैसर्गिक घटकांचा परिणाम मोजमापांवर होतो. त्यातून तापमानवाढीची तीव्रता लक्षात येते..संशोधकांनी नासा आणि नोआसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पाच स्वतंत्र जागतिक तापमान डेटासेटचे विश्लेषण केले. सांख्यिकी तज्ज्ञ ग्रँट फॉस्टर यांनी स्पष्ट केले, की या डेटामधून नैसर्गिक घटकांचा प्रभाव वजा केल्यावर तापमानवाढीचा खरा वेग समोर येतो. सुधारित आकडेवारीनुसार, २०१५ नंतर पृथ्वीच्या तापमानवाढीने धोकादायक पातळी गाठण्यास सुरुवात केली असल्याचा निष्कर्ष ९८ टक्क्यांहून अधिक योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे..२०२३, २०२४ ठरली विक्रमी उष्ण वर्षेसंशोधनानुसार, २०२३ आणि २०२४ ही वर्षे आजवरची सर्वाधिक उष्ण वर्षे ठरली आहेत. विशेष म्हणजे, नैसर्गिक घटकांचा प्रभाव कमी करून पाहिल्यानंतरही या वर्षांची उष्णता विक्रमीच राहते, असे संशोधकांनी नमूद केले आहे..पॅरिस करारातील मर्यादा ओलांडली जाण्याचा इशारामुख्य संशोधक स्टीफन रामस्टोर्फ यांनी इशारा दिला आहे, की जर तापमानवाढीचा सध्याचा वेग कायम राहिला, तर पॅरिस करारात निश्चित केलेली १.५ अंश सेल्सिअसची सुरक्षित मर्यादा २०३० पूर्वीच ओलांडली जाऊ शकते. यामुळे हवामान बदलाचे परिणाम अधिक गंभीर स्वरूपात जाणवण्याची शक्यता आहे. या निष्कर्षांमुळे, आतापर्यंत जागतिक स्तरावर तापमानवाढ रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जीवाश्म इंधनामुळे होणारे कार्बन उत्सर्जन तातडीने शून्यावर आणणे अत्यावश्यक असून, त्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवणे ही काळाची गरज बनली आहे..शेतीसाठी धोक्याची घंटातापमानवाढीचा वेग वाढत असल्याने शेती क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनियमित पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि पिकांच्या उत्पादनात घट यांसारख्या समस्या अधिक तीव्र होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन आणि हवामान-आधारित शेती पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे ठरत आहे. एकूणच, पृथ्वीच्या तापमानवाढीचा वाढता वेग हा केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर अन्नसुरक्षा आणि शेती व्यवस्थेसाठीही गंभीर इशारा ठरत आहे..तापमान कमी करण्यासाठी उपाययोजनाजीवाश्म इंधनाचा वापर कमी करून सौर व पवन ऊर्जेला प्रोत्साहनकार्बन उत्सर्जन नियंत्रणासह मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणहवामान बदल अनुकूल धोरणांची अंमलबजावणीठिबक-सिंचन, दुष्काळसहिष्णू वाण आणि पीक विविधिकरणाचा अवलंबसेंद्रिय शेती, मृद्संवर्धन व हवामान आधारित कृषी सल्ल्यांचा वापरउद्योग व शहरांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता, हरित इमारती व कचरा व्यवस्थापननागरिकांनी वीज बचत, सार्वजनिक वाहतूक व पर्यावरणपूरक सवयींचा अवलंब.तापमानवाढीचे प्रमुख दुष्परिणामउष्णतेच्या लाटांचे प्रमाण, कालावधी आणि तीव्रता वाढणेदुष्काळाची वारंवारता वाढून पाण्याची टंचाई तीव्र होणेअवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसानमातीची सुपीकता कमी होणेकीड व रोगांचे प्रमाण वाढणेसमुद्र पातळी वाढून किनारपट्टी भागांना धोकाजैवविविधतेचा ऱ्हास आणि पर्यावरणीय असमतोलमानवी आरोग्यावर उष्णतेचे दुष्परिणाम वाढणे.तापमानवाढीमुळे पिकांच्या वाढीचा कालावधी बदलतो, उत्पादन घटते आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. महाराष्ट्रात दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्ही टोकाच्या परिस्थिती वाढत असल्याने शेतकऱ्यांनी हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती पद्धती स्वीकारणे अत्यावश्यक झाले आहे.एस. डी. सानप, हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान विभाग, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.