Temperature Rise due to El Nino: दक्षिण कोरियास्थित ‘द एपीईसी क्लायमेट सेंटर’ने (एपीसीसी) नुकत्याच जारी केलेल्या ‘एल निनो वॉच’ या आपल्या मासिक अहवालात येत्या महिन्यांत जगभरात उबदार अवस्था तयार होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे काही प्रदेशांचा अपवाद वगळता जगाच्या बहुतांश भागात तापमान नेहमीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाजही यात व्यक्त करण्यात आला आहे..यामुळे पाऊसपद्धतींमध्ये (रेनफॉल पॅटर्न) बदल होणे शक्य असून, २०२६ च्या मध्यापर्यंत पॅसिफिक महासागराच्या सान्निध्यात असलेल्या प्रदेशांत अधिक पाऊस पडण्याचा, तर भारतासह नजीकच्या देशांमधील वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज या अहवालातून वर्तविण्यात आला आहे. यामुळे येथील शेती, जलसंपदा आणि हवामानातील स्थैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे..Pre Monsoon Rain: राज्यात ३ दिवस पावसाचा अंदाज; सोमवारी आणि मंगळवारी अनेक भागात पावसाचा अंदाज .‘एल निनो’ म्हणजे काय?विषुववृत्ताजवळ मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात होणारी वाढ म्हणजे एल निनो. यामुळे उष्णकटिबंधीय वातावरणीय प्रवाह, वाऱ्यांच्या पद्धती, हवेचा दाब आणि पावसाचे वितरण यांत कमालीचे बदल संभवतात. भारतातील बहुतांश पावसासाठी कारणीभूत असणाऱ्या नैर्ऋत्य मॉन्सूनवर ‘एल निनो’मुळे परिणाम होतो. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवते..२०२३ या वर्षी जूनमध्ये ‘एल निनो’स प्रारंभ झाला. ही स्थिती सुमारे ११ महिने टिकली. याचा परिणाम देशातील धान्य उत्पादनावर झाला. त्या वर्षी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन कमालीचे घटले होते. त्यामुळे अन्नधान्यांच्या किमतींतही वाढ झाली होती.या अहवालानुसार, दक्षिण हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीपेक्षा पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता आहे. उत्तर पॅसिफिक महासागराचा मध्य ते पश्चिम भाग, विषुववृत्तापलीकडील पूर्व उत्तर पॅसिफिक महासागर आणि उष्ण कटिबंधीय पश्चिम अटलांटिक महासागरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे..भारत, पूर्व-मध्य आफ्रिका, दक्षिण ऑस्ट्रेलिया, उष्णकटिबंधीय दक्षिण पॅसिफिक आणि पश्चिम उष्णकटिबंधीय अटलांटिकसाठीही तीच शक्यता असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे..Weather Alert: ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता.तापमानात वाढदक्षिण उप उष्णकटिबंधीय हिंदी महासागर, कॅरिबियन समुद्र, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उष्णकटिबंधीय हिंदी महासागर, अरबी समुद्र, वायव्य अटलांटिक, भूमध्य समुद्र, मध्य आफ्रिका, पूर्व आशिया, उत्तर पॅसिफिक, उष्णकटिबंधीय उत्तर पॅसिफिक, कॅरिबियन, उप उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, आग्नेय दक्षिण पॅसिफिक आणि दक्षिण अमेरिकेच्या वायव्य भागांत सामान्यपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे..तसेच, दक्षिण आशिया, पश्चिम आशिया, मध्य आशिया, युरोप, आर्क्टिक समुद्र, रशिया, ग्रीनलँड, उत्तर आफ्रिका, अमेरिका, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागात नेहमीपेक्षा अधिक तापमान अपेक्षित आहे. अशीच परिस्थिती दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातही राहील. मध्य उप उष्णकटिबंधीय दक्षिण पॅसिफिकमध्ये तापमान सामान्य राहण्याची दाट शक्यता आहे. तर आग्नेय उप उष्णकटिबंधीय हिंदी महासागरात तापमान खालावण्याची शक्यता आहे, असा अंदाज या अहवालाने वर्तविला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.