नाशिक अंतापूर, ता. सटाणा : ‘‘सटाणा तालुक्यातील गिरणा खोरे धरण समूहातील हरणबारी धरण प्रकल्प शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी चार वाजता पूर्ण क्षमतेने भरले’’, अशी माहिती पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौंदळ यांनी दिली.
एक हजार १६६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे असलेला हरणबारी धरण प्रकल्प मागीलवर्षी १२ ऑगस्टला मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरला होता. या वर्षी सहा दिवस अगोदर भरला. त्यामुळे सांडव्याद्वारे ५६ दशलक्ष घनफूट पाण्याचा मोसम नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी नामपूर, आंबासनपर्यंत पोहोचल्यास धरण प्रकल्पांतर्गत पूर पाणी डावा व उजवा कालव्यांना सोडण्यात येईल.
पश्चिम भागात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. हे धरण व परिसरात निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी पर्यटक येण्यास सुरवात झाली. या धरणक्षेत्रात पाहणी करताना नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाऊन मोबाईलद्वारे सेल्फी व इतर फोटो काढू नये, असे आवाहन रौंदळ यांनी केले.
धरण प्रकल्प पाणी विसर्ग व पाण्यामुळे इतर कोणताही धोका व पुढे कालव्यांना सोडण्यात येणारे पाणी वाया जाऊ नये, या साठी शाखा अभियंता व्ही. एम. आहेर, कर्मचारी दिलीप भदाणे लक्ष ठेवून आहेत. चालू वर्षी पूर्व भागात अत्यंत कमी पाऊस झाला आहे.
असेच वातावरण राहिल्यास पिण्याच्या व जलसिंचनाचा पाण्याचा प्रश्न उद्भवेल. त्यामुळे नागरिकांनी आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करून नियोजन करावे. सालाबादप्रमाणे लवकरच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत धरणावर जाऊन जलपूजन करण्यात येईल, असे द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.