धान, भरडधान्य खरेदी पोर्टलवर  नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ  On the grain, coarse grain purchase portal Second extension for registration 
मुख्य बातम्या

धान, भरडधान्य खरेदी पोर्टलवर  नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ 

पणन हंगाम २०२१-२२मध्ये विकेंद्रित धान व भरडधान्य योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची मुदत ३० सप्टेंबर होती.

टीम अॅग्रोवन

नाशिक : पणन हंगाम २०२१-२२मध्ये विकेंद्रित धान व भरडधान्य योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची मुदत ३० सप्टेंबर होती. त्यानंतर पुन्हा ही मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याबाबत नाशिक जिल्ह्यातील नामपूर बृहद्‌ विविध कार्यकारी सह.संस्थेने मागणी केली होती. तर पुन्हा दुसऱ्यांदा स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ही मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा वाढवली आहे.  राज्यात पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांच्या नोंदी न झाल्याने शेतकरी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतात. ही स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी या आशयाचे पत्र काढले आहे. मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांना या बाबत सूचित करण्यात आले आहे. यापुढे मुदतवाढ देत येणार नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.  खरीप पणन हंगाम २०२१-२२करिता शासनाने भरडधान्याचे हमीभाव हंगामासाठी निश्‍चित केले आहेत. ज्यामध्ये  मका १८७०, ज्वारी मालदांडी २७३८ व ज्वारी हायब्रीड २७५८, बाजरी २२५० व रागी ३३७७ रुपये प्रति क्विंटल असे जाहीर केलेले आहेत. नाव नोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत शासनाने दिलेली आहे. जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी सब एजंट संस्थांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने मका, ज्वारी, बाजरी व रागी उत्पादक शेतकऱ्यांची नाव नोंदणी करावी, असे आवाहन माहिती नाशिक जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन

MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार

Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

SCROLL FOR NEXT