पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. 
मुख्य बातम्या

माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये दिरंगाई

पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही आमच्या शेतीचा पंचनामा करायला कोणीही आलेले नाही. - सुनंदा वाघमोडे, शेतकरी, वाघमोडेवाडी.

टीम अॅग्रोवन

दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा दिल्याने माण तालुक्‍यात शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदर दुष्काळाने मारले अन्‌ नंतर पावसाने झोडपल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळणे दूरच, पण दिलासाही दिला जात नसल्याचे दिसत आहे. नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे होण्यात अक्षम्य दिरंगाई होताना दिसत आहे.

यंदा तालुक्‍यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला. यामुळे तलाव, ओढे, नदी, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. एकीकडे हा पाऊस सुखावणारा असला तरी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी साठल्याने उभी पिके कुजून गेली. काही ठिकाणी धाडसाने केलेली पेरणी कुचकामी ठरली. बियाणे, रोपे उगवलीच नाहीत. काही ठिकाणी पाणी साठून राहिल्याने वाफसा आला नाही. त्यामुळे पेरणी वा लागवड करणे अशक्‍य झाले.

शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. अजूनही अनेक शेतात पाणी साचलेले असून, कांद्यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. दावणीतील जनावरे चाऱ्यासाठी हंबरडा फोडत असल्याने नाईलाजास्तव जीव धोक्‍यात घालून केवळ जनावरांसाठी शेतकरी उरलासुरला चारा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. 

नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने समन्वय साधून तत्काळ करण्याची गरज आहे. मात्र, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर हे काम केले पाहिजे. मात्र, काही कर्मचारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी शासनाने दिलेल्या सूचना व घातलेल्या अटींमुळे पंचनामे करताना तांत्रिक समस्या उभ्या राहत आहेत. राजकीय मंडळी हे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत, अशी मागणी करत आहेत. तर प्रशासन नियमानुसार पंचनामे करण्यावर अडले आहे. यात कर्मचाऱ्यांची ससेहोलपट होत असून, शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.  सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. संबंधित पंचनाम्यांची माहिती जमा केली जात आहे. पंचनामे झाले नसतील अथवा व्यवस्थित केले जात नसतील तर संबंधित कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना विचारणा करून शहानिशा करण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT