The future of the buck market depends on direct sales 
मुख्य बातम्या

थेट विक्रीवरच बोकड बाजाराचे भवितव्य

स्थानिक बाजारही बंद आहेत. त्यामुळे ग्राहक ते थेट व्यापारी व शेळी पालक यांच्यातील व्यवहारावरच ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीचे भवितव्य अवलंबून आहे.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर  इतर जिल्हे व राज्यातून बकऱ्यांची आवक थांबली आहे. स्थानिक बाजारही बंद आहेत. त्यामुळे ग्राहक ते थेट व्यापारी व शेळी पालक यांच्यातील व्यवहारावरच ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीचे भवितव्य अवलंबून आहे.

कोरोना संकटामुळे गत चार महिन्यांपासून फुलंब्री तालुक्यातील सर्वात मोठ्या शेळ्यांच्या वदोडबाजारासह छावणी व इतर जिल्हानिहाय मराठवाड्यातील बाजार चार महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे ग्राहकाकडून विक्रेते व शेळी पालकांशी थेट संवाद साधला जात आहे. ऑनलाइन व सोशल मीडियाद्वारे बकऱ्यांच्या खरेदीवर भर दिला जातो आहे. शेळीपालकांना दर मिळत असले, तरी बकर ईदसाठी बकरा खरेदीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या बकरा खरेदीवर त्याचा थेट परिणाम झाल्याचे चित्र आहे.

सोजत व उस्मानाबादी जातीच्या बकऱ्यांना यावेळी मोठी मागणी असते. वडोद बाजार येथील आठवड्याला भरणाऱ्या बाजारात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातूनही विविध जातीच्या  बकऱ्यांची आवक होत असते. प्रत्येक आठवड्याला जवळपास १० हजार नगापर्यंत होणारी ही आवक चार महिन्यापासून थांबली आहे. गतवर्षी प्रति किलोस २१० ते २४० रुपये प्रति किलो प्रमाणे बकऱ्यांची विक्री होत होती. यंदा थेट ग्राहकांकडून होणाऱ्या मागणीमुळे बकऱ्यांचे दर वधारले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत ३२५ पंचवीस ते ४०० प्रति किलो प्रमाणे वजनानुसार बकऱ्याला दर मिळत आहे.

गतवर्षी साधारणतः ४० ते ६० किलोच्या बकऱ्याला त्याच्या जातीनुसार ८ हजारापासून २० हजारापर्यंत बकऱ्याला मिळणारे दर आता २३ ते २५ हजार रुपयेपर्यंत पोहोचले आहेत. काही पालकांना त्यांच्या बकऱ्याला गतवर्षी १५ ते २० हजार रुपयेपर्यंत ५० ते ६० किलोच्या बकऱ्याला दर मिळाले होते. आता ते २३ ते २५ हजार रुपये प्रति नगपर्यंत पोहोचले आहेत. मिळणारे दर पाहता बोकडाच्या संगोपनासाठी होणारा खर्च वसूल होण्याची आशा शेळीपालकांनी व्यक्त केली.

थेट विक्रीवरच भवितव्य बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर साधारणपणे ३ ते ४ आठवडे आधीपासून बकरा खरेदीला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते. थेट संवादातून किती ग्राहक किती बकऱ्यांची खरेदी करतात. सोशल मीडिया व ऑनलाईन माध्यमातून थेट विक्री किती होते. यावरच नफा, नुकसान अवलंबून असल्याचे शेळीपालक अफसरभाई यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Scheme: मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेच्या कामात भ्रष्टाचार? चौकशी होणार

Fish Farming: मत्स्यपालनामध्ये व्यावसायिक संधी...

Cotton Cultivation Tips: कपाशी लागवडीची पंचसूत्री

Soybean Milk Benefits: सोयाबीन दूध नवजात करडांसाठी फायदेशीर

Cattle Feed Price: दुग्धव्यवसाय तोट्यात; पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे का? पशुसंवर्धनमंत्र्यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT