The flood victims in Chalisgaon taluka will get Rs 3 crore 
मुख्य बातम्या

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना पावणे तीन कोटी मिळणार

चाळीसगाव तालुक्यात ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नदीकाठच्या गावांमधील बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली होती. अशा सर्व पशुपालकांना त्यांच्या पशुधन मृत्यूप्रकरणी अनुदान मिळावे, ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यात ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नदीकाठच्या गावांमधील बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली होती. अशा सर्व पशुपालकांना त्यांच्या पशुधन मृत्यूप्रकरणी अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केली होती. त्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली असून, या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी मदत व पुनर्वसन खात्याच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. यानुसार सुमारे पावणेतीन कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळतील, असे दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे.  तालुक्यात ऑगस्ट २०२१ मध्ये अतिवृष्टी झाली होती. पुराच्या पाण्यात तालुक्यातील वाघळी, वाकडीसह नदीकाठच्या काही गावांमधील बऱ्याच शेतकऱ्यांच्या गायी, म्हशी, बैल, वासरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या वाहून मृत्युमुखी पडल्या होत्या. ज्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा संबंधित विभागाने पंचनामा करून अहवाल शासनाला सादर केला होता. मात्र, अद्यापपर्यंत एकाही पशुपालकाला एक रुपयाचीदेखील मदत शासनाकडून झालेली नव्हती. या संदर्भात जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तालुक्यातील पशुपालकांच्या झालेल्या नुकसानाची त्यांनी सविस्तर माहिती देऊन पशुधनाच्या मृत्यूप्रकरणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.     

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Variety : पडीक जमीन लागवडीयोग्य केल्याने बीजोत्पादन क्षेत्र वाढले

Oxygenated Water : ऑक्सिजनेटेड पाण्याचा पिकांसाठी उपयोग

Ola Dushkal: ओला दुष्काळ जाहीर करा; 'नाहीतर राज्याची परिस्थिती नेपाळसारखी करु': शेतकऱ्याचा सरकारला इशारा

Soil Erosion : पाणलोट क्षेत्रातील धूप नियंत्रण

Solar Village : शेळकेवाडी झाले शंभर टक्के सौरग्राम

SCROLL FOR NEXT