silk  
मुख्य बातम्या

महारेशीम अभियानांतर्गत पाच हजार एकरची नोंदणी

महारेशीम अभियानाला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३० जानेवारीपर्यंत अभियानाला मुदतवाढ आहे. आजवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नर्सरी उभारण्याच्या कामाला सुरुवात करावी. तांत्रिकदृष्ट्या १० फेब्रुवारीपूर्वी नर्सरी उभी राहणे आवश्‍यक आहे. — दिलीप हाके, उपसंचालक, रेशीम मराठवाडा

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद: रेशीम विभागाच्यावतीने राबविल्या जात असलेल्या महारेशीम अभियानांतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २२ जानेवारीपर्यंत ५ हजार १७८ एकरवर रेशीमसाठी तुती लागवडीची नोंद शेतकऱ्यांनी केली आहे. मराठवाड्याला २ हजार एकरवर तुती लागवडीचा लक्षांक देण्यात आला होता. रेशीम उद्योगाला शेतकऱ्यांचा सातत्याने मिळणारा वाढता प्रतिसाद शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा उद्योग किती महत्त्वाचा हे अधोरेखित करीत आहे.   रेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पुढील वर्षासाठीच्या रेशीम उद्योगासाठी नोंदणी केली जात आहे. ७ जानेवारीपासून सुरू झालेले महारेशीम अभियान आधी २१ जानेवारीपर्यंत राबविल्या जाणार होते. या अभियानकाळातच काही ठिकाणी आलेल्या निवडणुकांमुळे तसेच नोंदणी व्यवस्थेतील तांत्रिक अडचणीमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या लक्षात घेऊन आता या अभियानांतर्गत शेतकरी व तुती क्षेत्र नोंदणीला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत राबविल्या जाणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून पोक्राअंतर्गत सहभागी गावांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. शिवाय औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड यांसह सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याने मराठवाड्यात महारेशीम अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रशासकीय यंत्रणेसाठी रेशीमविषयक प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणातून पोक्राअंतर्गत सहभागी गावांना नेमका महारेशीम अभियानामध्ये सहभागी करून घ्यायचा उद्देश याविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली.  यंदा महारेशीम अभियानात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना दिलेल्या लक्षांकात औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ३०० एकर तर राज्यातील एकूण तुती क्षेत्राच्या तुलनेत मराठवाड्यात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तुतीचे क्षेत्र आहे. जवळपास १० हजार ६७१ एकरवर विस्तारलेल्या  क्षेत्राच्या माध्यमातून १०२५३ शेतकरी रेशीम कोष उत्पादनाशी जोडले गेले आहेत. मिळालेल्या मुदतवाढीमुळे आता पुन्हा या क्षेत्रात भर पडणार हे स्पष्ट आहे.  बीड जिल्ह्यात सर्वाधिक पसंती मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५ हजार १५९ शेतकऱ्यांनी ५ हजार  १७८ एकरवर तुती लागवडीची तयारी दाखविली. रेशीम विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार २२ जानेवारीपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ५३५ एकर, उस्मानाबाद ५८२, बीड १६१९, जालना ६९३, लातूर ८३०, परभणी ३७५, हिंगोली ३३० तर नांदेड जिल्ह्यात २१४ एकरवर तुतीच्या लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी दाखविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT