Fear of ghateali in Vidarbha 
मुख्य बातम्या

विदर्भात हरभऱ्यात घाटेअळीची भीती

नागपूर : ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हरभरा पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची शक्‍यता कृषी विद्यापीठाने वर्तविली आहे.

टीम अॅग्रोवन

नागपूर  : ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हरभरा पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची शक्‍यता कृषी विद्यापीठाने वर्तविली आहे. याउलट कृषी विभागाने सध्या गहू, हरभरा पीक उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. 

रब्बी हंगामात विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये गहू, हरभरा ही पिके मुख्यत्वे घेतली जातात. अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यात गव्हाचे १५९६३८.०९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख २१ हजार ६७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लागवडीची टक्‍केवारी ७६ आहे. अमरावती विभागात ४४९७९६.२८ हेक्टर हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी ४३८२४९.९७ हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड झाली असून त्याची टक्केवारी ९७ आहे. 

नागपूर विभागात गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. नागपूर विभागात १५५९९६ हेक्टर हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी १८२००५.६ हेक्टर पेरणी झाली असून ती १६६.६७ आहे. सरासरीपेक्षा अधिक हरभरा लागवड नागपूर जिल्ह्यात झाली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र १२१७८०.५८ हेक्टर असून त्यापैकी  क्षेत्रापैकी ७७८७४.५३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. 

गहू लागवडची टक्केवारी ६३.९५ आहे. नागपूर विभागात सुरवातीला मुळकुज आणि मर रोगाचा प्रादुर्भाव हरभऱ्यावर झाला. मात्र गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मात्र कोणतेही नुकसान नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. याउलट कृषी विद्यापीठाचे तज्ञ डॉ. विनोद खडसे यांनी मात्र हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. 

मंगळवारी (ता.५) भंडारा दौऱ्यावर होतो. त्यावेळी काही शेतांना भेटी दिल्या. पीक समाधानकारक दिसून आले. सुरवातीला काही भागात हरभऱ्यावर मूळकूज आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. - रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर.

गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरण, पावसामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी नाही किंवा माहिती पण नाही.  - शंकर तोटावार, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT