Farmers in Pune district were scared due to cloudy weather 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. याचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. येत्या काळात जिल्ह्यात जास्त पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यातच गहू, हरभरा, ज्वारी पिकांबरोबरच विविध ठिकाणी भाजीपाला पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

सध्या जिल्ह्यातील अनेक भागांत कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर थंडी यामुळे गहू, कांदा पिकांचा फटका बसत आहे. त्यातच वाढीच्या अवस्थेतील गहू पिकांवरही रोग, किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. ढगाळ हवामानामुळे जोमात आलेल्या पिकांवर विविध अळ्यांनी आक्रमण केले आहे.

सततच्या बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. फवारणीच्या खर्चात वाढ होऊ लागली आहे. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ हवामानाचा परिणाम पिकांवर होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर प्रामुख्याने गव्हावर तांबेरा, कांद्यावर करपा, आकडी या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अळ्या, रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. या बरोबरच भाजीपाल्यासारख्या पिकांना देखील फटका बसत आहे. 

गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्याचा परिणाम पिकांवर झाला आहे. आता पुन्हा ढगाळ हवामान झाले आहे. त्यामुळे फळे व भाजीपाला पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.   - जितेंद्र बिडवाई, अध्यक्ष, द्राक्ष उत्पादक संघ, जुन्नर तालुका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Potato New Variety : बटाट्याच्या चार वाणाला मान्यता; बटाटा उत्पादन वाढीसह प्रक्रियेला फायदा

Sugarcane Weighing Irregularities: उसाची काटामारी आणि अपघात रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

Dubai Food Business: दुबई : वाळवंटातील जागतिक व्यापार केंद्र

Maharashtra Politics: सर्वोदयी सपकाळांची पायवाट

Microfinance Loan: सूक्ष्म कर्जाचा विळखा मोठा

SCROLL FOR NEXT