Of engineering students The sit-ins continue at the university 
मुख्य बातम्या

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठात ठिय्या सुरूच

नगर ः कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.७) सुरू केलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. ८) दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेचे विद्यार्थी बसून आहेत.

टीम अॅग्रोवन

नगर ः कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.७) सुरू केलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. ८) दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेचे विद्यार्थी बसून आहेत.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षेअंतर्गत कृषी सेवा मुख्यसेवा परिक्षेचा अभ्यासक्रम करताना कृषी अभियांत्रिकीसाठीचा अभ्यासक्रम कमी केला आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान, प्रक्रियांत अभियांत्रिकीची गरज असतानाही कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमात करताना अन्याय केला जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच परीक्षेचा अभ्यासक्रम असावा, अशा या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. 

कृषीशी निगडित अभियांत्रिकीची गरज असूनही कृषी क्षेत्रात येण्याची संधी भेटण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा अभ्यासक्रम मागे घेऊन नवीन अभ्यासक्रम करताना तांत्रिक ज्ञान, विविध पदांचे कर्तव्य, व जबाबदाऱ्या याचा विचार करून अभ्यासक्रम करावा, अशी मागणी विजय शिंदे यांनी केली. 

अक्षय नागरगोजे, ज्ञानेश्वर मोरे, अरुण बुरुंगे, अनिकेत थोरात, सौरभ शिंदे, अजय सातघरे, अक्षय किंगे, हर्षल बागूल, नीलेश माले, जान्हवी जोशी, ऋतुजा कुकडे, ऋतुजा माने, प्रतीक्षा राणे, राहुल अनारसे, गणेश शेळके, सुदामा काकडे, अभिजित राजपूत, यांच्यासह २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आंदोलनात उतरले आहेत. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्याशी चर्चा केली. मात्र समाधान न झाल्याने आंदोलन सुरुच ठेवले आहे. दरम्यान, मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेने दिला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सातारा जिल्ह्यात १ लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार

Delhi Farmers Meeting : ‘दिल्ली’ने ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Rabi Crop Seminar : संकटाच्या स्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसोबत; रब्बी पीक परिसंवादात तज्ज्ञांचा दिलासा

Chimur Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चिमूरमध्ये आक्रोश मोर्चा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

SCROLL FOR NEXT