Drinking water from 29 water sources in Sindhudurg 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्गला २९ जलस्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य

जलजीवन मिशनतर्गंत एकाच दिवशी तपासण्यात आलेल्या ५ हजार ९४९ नमुन्यापैकी २९ जलस्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जलजीवन मिशनतर्गंत एकाच दिवशी तपासण्यात आलेल्या ५ हजार ९४९ नमुन्यापैकी २९ जलस्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यातील जलस्रोतांचा समावेश आहे.  जलजीवन मिशनच्या पाणी गुणवत्ता सनियत्रंण व सर्वेक्षण उपक्रमातर्गंत एकाच दिवशी जिल्ह्यातील ५ हजार ९४१ पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने तपासण्यात आले होते. गावागावातील महिलांना पाणी तपासणीचे प्रशिक्षण देऊन नमुने तपासण्यात आले होते.  दरम्यान तपासण्यात आलेल्या स्त्रोतांपैकी २९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कुडाळमधील १०,कणकवलीतील १३ आणि मालवणमधील ६ जलस्रोतांचा समावेश आहे. पिण्यास अयोग्य असलेल्या जलस्रोतांचे पाणी शुद्धीकरण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. शुद्धीकरण प्रकियेनतंर त्या पाणी स्रोतांचा पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. 

पुढील तालुक्यातील जलस्त्रोतांचा समावेश  कुडाळ ः १०  कणकवली ः १३  मालवण ः ६   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT