Differences in insurance returns for pomegranate, citrus and lemon in Jalna district 
मुख्य बातम्या

जालना जिल्ह्यात डाळिंब, मोसंबी, लिंबूच्या विमा परताव्यात तफावत

जालना : जिल्ह्यात ‘मृग बहार २०२१’च्या सीताफळ पीक विमा परतावाप्रमाणेच डाळिंब, मोसंबी, लिंबू, पेरू या फळपिकांच्या मंजूर विमा परताव्यातही मंडळागणिक तफावत दिसूनयेत आहे.

टीम अॅग्रोवन

जालना : जिल्ह्यात ‘मृग बहार २०२१’च्या सीताफळ पीक विमा परतावाप्रमाणेच डाळिंब, मोसंबी, लिंबू, पेरू या फळपिकांच्या मंजूर विमा परताव्यातही मंडळागणिक तफावत दिसून येत आहे.

जालना जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने अंतर्गत ‘मृगबहार २०२१’ साठी मंडळनिहाय विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३८ पैकी २८ मंडळांतील सीताफळ उत्पादकांना वीमा परतावा मंजूर झाला. परंतु १० मंडळे त्यामधून वगळली गेली. त्याचप्रमाणे आता डाळिंब, मोसंबी, लिंबू, पेरू या फळपिकांच्या विमा परताव्यातही तफावत दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील ३८ पैकी केवळ १८ मंडळांतील डाळिंब उत्पादकांना विमा परतावा मंजूर झाला आहे. त्यापाठोपाठ ११ मंडळांतील मोसंबीसाठी, १२ मंडळांत लिंबूसाठी, १६ मंडळातील पेरूसाठी, एका मंडळातील चिकूसाठी विमा परतावा मंजूर झाला आहे. त्यात तफावत दिसून येत आहे. अनवा मंडळात मोसंबीसाठी हेक्‍टरी १२ हजारांचा, तर उर्वरित १० मंडळात हेक्‍टरी १८ हजार रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे. डाळिंबासाठी १८ पैकी शेलगाव मंडळात २९०००, परतूर मंडळात २३ हजार ६००, वाटूर व विरेगाव मंडळात ५९०० रुपये तर इतर १४ मंडळात ११ हजार ८०० रुपये प्रतिहेक्‍टरी परतावा मंजूर झाला आहे. 

लिंबूसाठी अनवा मंडळात सर्वाधिक ३५ हजार रुपये हेक्टरी तर इतर ११ मंडळात १७ हजार ५०० रुपये विमा परतावा मंजूर झाला आहे. पेरूसाठी ज्या १६ मंडळात विमा परतावा मंजूर झाला. त्यापैकी १२ मंडळात हेक्‍टरी १२ हजार रुपये, तीन मंडळात हेक्टरी ३० हजार रुपये, तर अनवा मंडलात हेक्टरी २४ हजार रुपये प्रतिहेक्टरी परतावा मंजूर झाला आहे. चिकूसाठी जालना ग्रामीण मंडळात हेक्‍टरी २७ हजार रुपयेप्रमाणे पीक विमा परतावा मंजूर झाला आहे, अशी माहिती कृषी विभाग व विमा कंपनीच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT