Daily extraction of one pound TMC of water from Mahisal, Tembhu schemes 
मुख्य बातम्या

म्हैसाळ, टेंभू योजनांतून दररोज पाऊण टीएमसी पाणी उपसा

पुराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात देण्यासाठी टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सर्व पंप सुरू केले आहेत. गेल्या सात ते आठ दिवसांपासून ही योजना सुरू असून दोन्ही योजनेतून दररोज सुमारे पाऊण टीएमसी पाणी उचलले जाते.

टीम अॅग्रोवन

सांगली ः पुराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात देण्यासाठी टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सर्व पंप सुरू केले आहेत. गेल्या सात ते आठ दिवसांपासून ही योजना सुरू असून दोन्ही योजनेतून दररोज सुमारे पाऊण टीएमसी पाणी उचलले जाते.  

दोन्ही योजनांतून सात टीएमसीहून अधिक पाणी उचलले जाणार आहे. म्हैसाळ योजनेतून जत, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्‍यातील तलाव-बंधारे भरून घेण्याचे काम सुरू झाले आहे. म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेचे पंप सुरू करून पाटबंधारे विभागाने जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील दुष्काळी भागातील तलाव भरून घेतले जाणार आहे. हे पाणी थेट शेतीला, पिण्यासाठी आणि तेथील भूजल पातळी उंचावण्यास फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे.

 गेल्या सहा दिवसांपासून या दोन्ही उपसा सिंचन योजना सुरू आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी जत तालुक्याच्या पुढे म्हणजे सांगोला तालुक्याकडे पोहोचू लागले आहे. पहिल्यांदा सांगोला तालुक्यातील तलाव पाण्याने भरून दिले जाणार आहेत. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज तालुक्यातील तलावात पाणीसाठा केला जाणार आहे.  

म्हैसाळ योजना सुरू केल्यानंतर २५ पंप सुरू केले. जसजसे पाणी पुढे जाईल तसतसे जादा पंप सुरू केले जात आहेत. सध्या ४५ पंप सुरू आहेत. पाणी पाचव्या टप्प्यात पोहोचले. पाणी शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर ६० पंप सुरू करण्यात येतील. सध्या तरी सर्व तलाव, बंधारे भरून घेण्याचे नियोजन आहे.

प्रत्येक दिवशी अर्धा ते एक टीएमसी पाण्याची उचल केली जात आहे. एक पंप ३६०० अश्‍वशक्तीचा आहे. त्यामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. तसेच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT