Conservation of native cow breeds is required 
मुख्य बातम्या

देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचे

देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना या राज्यांमध्ये जुन्या प्रजातीची संख्या कमी आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना या राज्यांमध्ये जुन्या प्रजातीची संख्या कमी आहे. मात्र, महाराष्ट्रात सुदैवाने सहा ते सात प्रजाती व काहींच्या उपप्रजाती आहेत. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे महाविद्यालयात सुरू केलेले देशी गोवंश संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्फूर्तिदायक बनेल, असा विश्वास कण्हेरी मठाचे श्री. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग व देशी गोवंश संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘देशी गोपालक व गोशाळा चालक’ परिसंवाद हा कार्यक्रम मंगळवारी (ता. १९) डॉ. शिरनामे सभागृहात झाला. 

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, ‘वनामकृवि’चे डॉ. स्मिता सोळंकी, परभणी पशुवैद्यकीय सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, प्रा. देवदत्त हजारे, संतोष राऊत, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. धीरज कणखरे, डॉ. प्रमोद साखरे, प्रा. रामदास शेंडे आदी उपस्थित होते. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी प्रास्ताविक केले. सहशास्त्रज्ञ डॉ. सुनील अडांगळे यांनी आभार मानले.

साहिवालच्या सहा हजारांच्या सहा लाख गाई होण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी कृषी योजनांसाठी जसे अनुदान दिले जाते, त्याप्रकारे गोपालनासाठी अनुदान दिले तर शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल. - डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू

दापोली कृषी विद्यापीठातही गोपालनाचा विस्तार केला जाईल. गोपालन केल्यामुळे गाईच्या शेणापासून विविध वस्तू बनविल्या जातात. त्यामुळे गोपालनाचे महत्त्व वाढले आहे. कोकणात कपिला गाईचे ब्रीड रजिस्टर केले आहे.  - डॉ. संजय सावंत, कुलगुरू  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT