meeting  
मुख्य बातम्या

बोंडअळी निर्मुलन मोहीम कागदावरच

कृषी विभागाची बोंडअळी निर्मुलन मोहीम कागदावरच राहिली. त्यामुळेच बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सर्वदूर वाढला.

टीम अॅग्रोवन

यवतमाळ ः कृषी विभागाची बोंडअळी निर्मुलन मोहीम कागदावरच राहिली. त्यामुळेच बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सर्वदूर वाढला. पुसद उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित तर घरात बसूनच ही मोहीम राबविण्यात आली. परिणामी पुसद उपविभागातील शेतकऱ्यांना बोंडअळीचा सर्वाधीक फटका बसल्याचा गंभीर आरोप प्रयोगशील शेतकरी मनीष जाधव यांनी केला.  जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉलमध्ये बोंडअळी नियंत्रणाबाबत आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जाधव यांच्यासह शेतकरी अरविंद बेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विद्यापीठाच्या यवतमाळ प्रादेशिक संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रमोद यादगीरवार, ‘केव्हीके’ तज्ज्ञ, बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीत कृषी विभागाकडून बोंडअळी नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.  शेतकरी मनीष जाधव यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला. जाधव म्हणाले, की पुसद उपविभागीय कृषी कार्यालयाकडून बोंडअळी जागृतीच्या संदर्भाने करण्यात आलेले दावे खोटे आहेत. पुसद उपविभागात बोंडअळी विषयक बैठका घेण्यात आल्याचे सांगितले जाते. अशा एखाद्या ठिकाणची माहिती द्यावी किंवा छायाचित्र दाखवावे, तसेच बैठकीला उपस्थित शेतकऱ्यांची नावे जाहीर करावी, असे आव्हान त्यांनी केले. त्यांच्या या प्रश्‍नावर कृषी विभाग निरुत्तर झाल्याने पुसद उपविभागासह जिल्ह्यात सर्वदूर बैठका कागदावरच झाल्याच्या शक्‍यतेला दुजोरा मिळत असल्याचे मनीष जाधव म्हणाले. जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला हे कृषी विभागाचेच अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. मनीष जाधव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बैठकीचा सूरच पालटला होता.  दरम्यान पुसद उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. प्रतिक्रिया कृषी विभागाकडून बोंडअळी निर्मूलनाबाबत शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. यामध्ये बोंडअळी जागृतीबाबत बैठका कागदोपत्री झाल्याचा आरोप करण्यात आला. परंतु तसे नाही; कृषी विभागाने आपल्यास्तरावर व्यापक जागृती केली आहे. यापुढील काळात या मोहिमेला अधिक गती देण्यात येणार आहे. - नवनाथ कोळपकर,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

Kashmir Cold Weather : हिमवृष्टीने काश्‍मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला

Memorandum of Understanding : दापोली येथील कृषी विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाशी करार

Sugar Factory : वेळेत परवाने दिल्याने ३८ कारखान्यांची धुराडी पेटली

Farmer Producer Organizations : ‘एफपीओं’ना बीजोत्पादनात आणा; केंद्राच्या सूचना

SCROLL FOR NEXT