संतुलित खत व्यवस्थापन आवश्‍यक : पवार 
मुख्य बातम्या

संतुलित खत व्यवस्थापन आवश्‍यक : पवार

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘‘रोजच्या आहाराबाबत सध्या लोकांमध्ये सजगता, जागरुकता आली आहे. सेंद्रिय शेतीच्या शेतमालाला उठाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे,’’ असे मत महापालिकेचे उपायुक्त अजयसिंह पवार यांनी केले. 

सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात खत वापर जागृती कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. केंद्र सरकारच्या शेतकरी कल्याण व कृषी मंत्रालय तसेच खत मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम झाला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यामध्ये केंद्रीय खते व रसायनमंत्री सदानंद गौडा, केंद्रीय राज्यमंत्री कृषी सहकार व शेतकरी कल्याण पुरुषोत्तम रुपाला यांचा समावेश होता. शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड अध्यक्षस्थानी होते. रब्बी ज्वारी संशोधन केंद्राचे डॉ. के. के. शर्मा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे शास्त्रज्ञ आशिष मैती, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूरचे मृदा सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉ. डी. व्ही. इंडी, कृषी उपसंचालक रवींद्र माने, आत्माचे उपसंचालक मदन मुकणे, कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ला. रा. तांबडे उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्याच्या प्रगतीवर, कामावरच देशाची प्रगती अवलंबून आहे. त्यामुळे योग्य त्या पद्धतीने नियोजनाने शेती करणे गरजेचे आहे.’’गायकवाड म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी स्वतःच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शेणखताचा जास्तीत जास्त वापर करावा. हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा. त्यांनी जैविक खते खात्रीच्या संस्थांकडूनच खरेदी करावी.’’

केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. आशिष मैती म्हणाले, ‘‘जैविक खतांचा वापर करणे आवश्‍यक आहे. जमिनीचा पीएच कमी करण्यासाठी जिप्समचा वापर वाढविणे गरजेचे आहे.’’ या वेळी अमोल शास्त्री, डॉ. तांबडे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्ही. बी. भिसे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप गोंजारी यांनी आभार मानले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT