Approve the sub-center of Central Spices Board in Hingoli 
मुख्य बातम्या

`हिंगोलीत केंद्रीय मसाले मंडळाचे उपकेंद्र मंजूर करा`

हिंगोली : भौगोलिक मानांकनासाठी (जी. आय) प्रयत्न हिंगोली येथे केंद्रीय मसाले मंडळचे उपकेंद्र मंजूर करावे, यासह अनेक महत्त्वपूर्ण मुद्यावर हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ अभ्यास समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

टीम अॅग्रोवन

हिंगोली : हळदीच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना सुधारित वाणांचा दर्जेदार बेणे पुरवठा करावा. कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेले नवीन वाण विकसित करण्यावर भर, मु्ल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योग उभारणी तसेच निर्यातीस चालना, भौगोलिक मानांकनासाठी (जी. आय) प्रयत्न हिंगोली येथे केंद्रीय मसाले  मंडळचे उपकेंद्र मंजूर करावे, यासह अनेक महत्त्वपूर्ण मुद्यावर हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ अभ्यास समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

हिंगोली येथे हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळासाठी स्थापित अभ्यास समितीची पहिली बैठक खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषी आयुक्त धीरज कुमार ,महाराष्ट्र कृषी उत्पन्न महामंडळ उपमहाव्यवस्थापक सुनील पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भाजीपाला, मसाले पिके संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. व्ही एस. खंदारे, पणन महामंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक महेंद्र पवार,कृषी उपसंचालक एस.व्ही. लाडके आदी उपस्थित होते.

पाटील  म्हणाले, ‘‘हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने हळदीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावेत. दापोली, राहुरी आणि परभणी कृषी विद्यापीठांनी कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेले हळदीचे नवीन वाण तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संशोधन करावे. जीआय नामांकनासाठी कॉमर्स कमिटी आणि स्पाईस बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात येईल.’’ 

यावेळी हळद संशोधन, प्रक्रिया महामंडळाचे मुख्य कार्यालय हिंगोली येथे स्थापनेसाठी प्रस्तावाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. अन्य हळद  उत्पादक राज्यात जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी, शास्त्रज्ञ यांचे अभ्यास दौरे करण्यात येतील. यावर सुद्धा शिक्का मोर्तब करण्यात आले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT