Allow sale of Nagpuri oranges at railway station: Tadas 
मुख्य बातम्या

रेल्वेस्थानकावर नागपुरी संत्रा विक्रीला परवानगी द्या ः तडस

वर्धा ः नागपूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. देशाच्या अनेक राज्याशी या स्थानकाच्या माध्यमातून जुळता येते. ही बाब लक्षात घेता नागपुरी संत्र्याची पॅकिंग व विक्रीला या स्थानकावर परवानगी दिल्यास संत्रा उत्पादकांचे व्यापक हित साधता येणार आहे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे.

टीम अॅग्रोवन

वर्धा ः नागपूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. देशाच्या अनेक राज्याशी या स्थानकाच्या माध्यमातून जुळता येते. ही बाब लक्षात घेता नागपुरी संत्र्याची पॅकिंग व विक्रीला या स्थानकावर परवानगी दिल्यास संत्रा उत्पादकांचे व्यापक हित साधता येणार आहे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. रेल्वेचे प्रबंधक सोमेश कुमार यांच्याशी चर्चेत ही मागणी केली गेली.

रंग, चव व गुणवत्तेच्या बाबतीत नागपुरी संत्र्याने वेगळेपण जपले आहे. मात्र, पारंपरिक बाजारपेढेशिवाय इतर कोणताच पर्याय संत्रा उत्पादकांना उपलब्ध नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर अशाप्रकारची सोय उपलब्ध झाल्यास त्याचा निश्चित फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळत प्रवाशांना चांगल्या प्रतीची संत्री मिळतील. शेतकऱ्यांच्या मुलांना यातून रोजगारही प्राप्त होणार आहे. त्यामुळे या पर्यायाचा विचार करण्याची मागणी करण्यात आली.

रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्याशी चर्चा करून त्यांना रेल्वेस्थानकावर संत्रा विक्रीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यामुळे नागपुरी संत्र्याला मोठी बाजारपेठ आणि शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. - डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Industry Target: पुणे जिल्ह्यातील कृषी उद्योगाचे १२ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट

APMC Contribution Waiver: दुष्काळी बाजार समित्यांचे अंशदान माफ करा : सोमवंशी

US Import Ban: कॅनडाच्या उत्पादनांवर अमेरिकेची बंदी

Farmer Diwali Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार : बावनकुळे

Maharashtra Sugar Industry: एक नोव्हेंबरनंतरच साखर कारखाने सुरू करा: इंडियन इरिगेशन फेडरेशनची मागणी

SCROLL FOR NEXT