In Ajra, women will cultivate indigenous seeds
In Ajra, women will cultivate indigenous seeds 
मुख्य बातम्या

आजऱ्यात महिला करणार देशी बियाण्यांचे संवर्धन

टीम अॅग्रोवन

आजरा, जि. कोल्हापूर : आजरा घनसाळ, काळा जिरगा या सुवासिक जातींबरोबरच तालुक्यात विविध प्रकारच्या देशी बियाण्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न कृषी विभाग, शेतकरी मंडळ यांसह विविध घटकांकडून होत आहे. यामध्ये यंदा महिलांनीही सहभाग घेतला असून, साळगाव, दाभिल व देवकांडगाव या गावांतील महिला बचत गट ग्रामसंघ सक्रिय झाले आहेत. या गावांत ८० प्रकारच्या स्थानिक प्रजातींचे संवर्धन केले जाणार आहे. वन विभागाच्या वन अमृत योजनेअंतर्गत हा प्रयोग राबविला जात आहे. बियाणे बॅंकेचा तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

सुधारित, संकरित व संशोधित बियाण्यांमुळे देशी वाण लोप पावत चालले आहे. देशी वाण वाचवावयाची असतील, तर सीड बॅंक (बियाण्यांची बॅंक) उभारणे गरजेचे आहे. आजरा तालुक्यात देशी वाणांमध्ये भाताच्या विविध जाती होत्या. कालौघात या जाती नष्ट पावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे. साळगाव, दाभिल व देवकांडगावमधील ९० बचत गट ग्रामसंघ देशी वाण संवर्धनासाठी पुढे आले आहेत. वन अमृत योजनेमार्फत ८० वाणांची लागवड करून त्याचे संवर्धन केले जाणार आहे. यासाठी बचतगटांना ८० २२० किलो बियाणे पुरवले आहे. उपजीव तज्ज्ञ योगेश फोंडे, समन्वयक शांताराम कांबळे, वनस्पती तज्ज्ञ डॉ. एन. बी. गायकवाड यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे.

बियाणे बॅंकेत या बियाण्यांचा समावेश वरंगळ, रेड मुसळी, सोनफळ, सोरटी, तांबडी कर्जत, टाक भात, जोंधळा जिरगा, कोथमिरसाळ, पंचगंगा, आंबेमोहोर, काळा जिरगा, मांजरवेल, खप मोठ, लक्ष्मी, सव्वाशीन, पनवेल, तांबड मासाड, तुळशई भात, एककाडी, भोगावती, दोडगा, जया, सगुणा, कोरजाई, मनिला, गजरावती, इटाण, कावेरी, अकीलसाळ, बासमती गावठी, नाचणी भात, भडस, मोठीरत्ना, सोमशिळा, चंपाकळी, वांडर भात, काळ भात, कुडतरी, जवाऱ्या भात, डांगी, अखिलसाळ, काळीकुडई, तांबडा जोगा, भोवड्या, वालय, करंगुट, वैशाखी, कोळपी, चिमणसाळ, गारीकोळपी, सुगंधी भोग, एवेरथ, निरुल्या, मकम, तरुण भोग, दांडेली, कोचरी, कसबाई, मसुरा, जिरेसाळ, साळवा, तांबडीमाळ, कालेखी, जिरेसाळमोठ, भाळूसत्ता, तुळशी मंजुळा, जिरेल, हेजवी, वेगमभोग, लाल सुकडू, दोडीहाळ, काळी डांगर, देशीभात, हिरानखी, मणीभोग, कुनी, वस्कमाला, सोनहिरा, सिद्धी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT