eknath dawale  
मुख्य बातम्या

कृषी सचिव डवले यांनी घेतला `महाबीज`चा आढावा

आगामी रब्बी हंगामासाठी `महाबीज`कडे कोणत्या वाणाचे किती बियाणे उपलब्ध आहे, यंदासाठी काय नियोजन केले याचा आढावा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी घेतला.

टीम अॅग्रोवन

अकोला ः आगामी रब्बी हंगामासाठी `महाबीज`कडे कोणत्या वाणाचे किती बियाणे उपलब्ध आहे, यंदासाठी काय नियोजन केले याचा आढावा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी घेतला. मंगळवारी (ता.१५) श्री. डवले यांनी `महाबीज`ला धावती भेट देत काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.  कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला `महाबीज`चे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, मार्केटींग व्यवस्थापक अजय कुचे, उत्पादन व्यवस्थापक सुरेश फुंडकर, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थापक प्रफुल्ल लहाने, प्रक्रिया व्यवस्थापक प्रशांत पाग्रुत आदी मोजकेच अधिकारी उपस्थित होते.  येत्या काही दिवसात `महाबीज`च्या बोर्डाची बैठक होऊ घातली आहे. या बैठकीच्या अनुषंगाने असलेल्या मुद्यांचा आढावा श्री. डवले यांनी घेतला. सोबतच त्यांनी आगामी रब्बीसाठी `महाबीज`ने काय नियोजन केले याची माहिती जाणून घेतली. प्रामुख्याने हंगामात शेतकऱ्यांना हरभरा, ज्वारी, गव्हाचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी `महाबीज`च्या अधिकाऱ्यांना केल्‍या.  श्री. डवले यांच्या या दौऱ्याबाबत कृषी खात्यालाही फारशी माहिती नव्हती. ते अकोल्यात पोचले आणि `महाबीज`मध्ये आढावा घेऊन पुढील ठिकाणी रवाना झाले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhimashankar Forest Controversy: कर्जत-भीमाशंकर वृक्षतोडीवरून संघर्ष तीव्र; पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर

Rabi Crop Loan: दुष्काळामुळे रब्बी पीककर्ज वाटप घटण्याची चिन्हे; १५ ऑक्टोबरपर्यंत केवळ सहा टक्के वाटप

GM Soymeal Import: तीस लाख टन जीएम सोयापेंड आयातीला परवानगी द्या; ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनची मागणी

Cyclone Arnab: बंगालच्या उपसागरात ‘अर्णब’ चक्रीवादळ

Rain Forecast: पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT