Maharashtra Weather Prediction: राज्यात कमाल तापमान अद्यापही पस्तिशीपार असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे आज (ता. २७) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..बंगालच्या उपसागरात ‘अर्णब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या कमी दाब प्रणालीपासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे..राज्यात उन्हाचा चटका कायम असून, पारा अद्याप ३५ अंशांच्या पार गेला आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर, अकोला, अमरावती आणि वाशीम येथे ३६ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर, जळगाव, जेऊर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, चंद्रपूर येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे..Maharashtra Rain Update: अर्णब चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा इशारा; पाच दिवसांचा अंदाज काय? .राज्याच्या किमान तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत असून, पहाटेच्या वेळी काहीसा गारठा जाणवायला लागला आहे. राज्यात काही भागांत धुके आणि दव पडल्याचे दिसून येत आहे. सोमवारी (ता. २६) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..आज (ता. २७) पूर्व विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा ( येलो अलर्ट ) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः निरभ्र आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे उद्या (ता. २८) पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे..Maharashtra Weather Update: उत्तर कोकणात उष्ण, दमट हवामान शक्य; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्ये विजांसह पावसाचा अंदाज.सोमवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३५.३---१७.४अहिल्यानगर---३५---२२.८धुळे---३४.०---१३जळगाव---३५.२---१५.४जेऊर---३५---१८कोल्हापूर---३२.२---२०.१महाबळेश्वर---२६.३---१७नाशिक---३४.१---१६.२निफाड---३५.२---१७.सांगली---३४.२---१९.३सातारा---३४.८---१७.५सोलापूर---३६.४---२०.३सांताक्रूझ---३६.५---२२.५डहाणू---३४.१---२१.७रत्नागिरी---३३.५---२३.२छत्रपती संभाजीनगर---३५.४---१८.२धाराशिव---३५---१९.४.परभणी---३४.४---१६.९परभणी (कृषी)---३४---१४.५अकोला---३६.३---१९.८अमरावती---३६---१८.९ब्रह्मपूरी---३३.१---१९.४बुलडाणा---३४.६---२०.८चंद्रपूर---३५.६---१८.६गडचिरोली---३३.६--१८..गोंदिया---३२.५---१६.५नागपूर---३४.२---१७.२वर्धा---३४---१८.६वाशीम---३६---१६यवतमाळ---३४.८---१६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१३---३५.२पश्चिम महाराष्ट्र---१७---३६कोकण---२१.७--३६.५मराठवाडा---१४.५---३५.४विदर्भ---१६---३६.३.विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : सांताक्रूझ ३६.५, सोलापूर ३६.४, अकोला ३६.३, अमरावती ३६, वाशीम ३६..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.