Agriculture assistant recruitment postponed 
मुख्य बातम्या

अकोला :कृषी सहायक पदभरती पुढे ढकलली 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी सहायक पदासाठी रविवारी (ता. १४) आयोजित लेखी परीक्षा एसटी कामगारांच्या संपामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी सहायक पदासाठी रविवारी (ता. १४) आयोजित लेखी परीक्षा एसटी कामगारांच्या संपामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या बाबत विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी जाहीर केले. आता पुढील परीक्षेची तारीख विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर केली जाणार आहे.  विद्यापीठांतर्गत कृषी सहायक (पदविका, पदवीधर) पदासाठी दोन वर्षांपूर्वी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर कोरोना काळामुळे पदभरती रखडत गेली. गेल्या महिन्यात ही परीक्षा घेतली जाणार असतानाच आरोग्य सेवेचा पेपर एकाच दिवशी आल्याने परीक्षा पुढे ढकलून १४ नोव्हेंबरला घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार परीक्षेचे नियोजन केले जात होते. दरम्यानच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप कायम राहल्याने व वाहतुकीची समस्या निर्माण झालेली असल्याने आताही परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली होती. कार्यकारी परिषद, विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू, कुलसचिवांकडे या बाबत मागणी केली. कृषिमंत्र्यांकडेही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मागण्यांची दखल घेत सायंकाळच्या सुमारास रविवारी होऊ घातलेली परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. आता परीक्षेची पुढील तारीख विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती कुलसचिव सुरेंद्र काळबांडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

Marathwada Agriculture Crisis : पाण्यासाठी बळीराजा चिंतेत; बीड, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात रब्बी पेरण्या थंडावल्या

Plowman's Folly: प्लोमॅन्स फॉली : विना नांगरणी शेतीतील प्रयोगांचे सार

Solapur DCC Bank Election: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला; आठ वर्षांनंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

SCROLL FOR NEXT