lampi skin  
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात साठ हजार जनावरांना ‘लंम्पी’चा प्रादुर्भाव

जिल्ह्यामध्ये मागील ऑगस्ट महिन्यापासून गाय तसेच म्हैस वर्गातील जनावरांना ‘लंम्पी स्किन डिसीज’ आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला.

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यामध्ये मागील ऑगस्ट महिन्यापासून गाय तसेच म्हैस वर्गातील जनावरांना ‘लंम्पी स्किन डिसीज’ आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. सोळा तालुक्यांतील एक हजार २३२ गावांत ५९ हजार ५७५ जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर लसीकरण करण्यात आले. सध्या हा आजार नियंत्रणात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या काळामध्ये जनावरांनाच्या अंगावर गाठी येऊन त्यातून रक्तस्राव होत असल्याचा प्रकार आढळून आला. हा आजार एका जनावराला झाल्यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतर जनावरांनाही त्याचा प्रादुर्भाव होतो.  महागडा उपचार करूनही आजार नियंत्रणात येत नसल्याने पशुपालक हैराण झाले होते.  ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात जिल्ह्यातील सोळा तालुक्यांतील एक हजार २३२ गावांतील जनावरांच्यामध्ये ‘लंम्पी स्कीन डिसीज’ आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला. यात गाय वर्गातील जनावरांची मोठी संख्या होती. म्हैस वर्गातील जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होता. जिल्ह्यात ५९ हजार ७५७ जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. जिल्ह्यासाठी ९८ हजार ७०० गोटपॉक्स लस मिळाली होती. पशुसंवर्धन विभागाने ८५ हजार ३९० जनावरांना लसीकरण केले. यामुळे हा आजार सध्या आटोक्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. घुले यांनी सांगितले. सध्या लसीकरणाचे काम पूर्ण झाले असून सर्व जनावरे आजारमुक्त झाली आहेत. सध्या जनावरांना नव्याने हा आजार आढळून आला नाही.

पशुपालकांना मार्गदर्शन `लंम्पी’चा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना विलगीकरण करण्यासह गोचीडाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात तसेच गोठ्यात फवारणी करण्यात आली. पशुपालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. लसीकरणासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याने आजार आटोक्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. घुले यांनी दिली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT