पिककर्ज वाटप  
मुख्य बातम्या

पीककर्जाचे ५४४ कोटी सांगली जिल्ह्यात थकीत

टीम अॅग्रोवन

सांगली : कर्जमाफीच्या घोषणांनी शेतीकर्ज वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. सभासद पातळीवर केवळ ३५ टक्के इतकीच कर्जवसुली झाली आहे. जिल्हा बँकेचे ५४४ कोटी ३२ लाख   रुपयांचे शेतीकर्ज थकबाकीत गेले आहे. ८१ हजार ३३ शेतकरी थकबाकीदार झाले आहेत.  कर्जमाफी योजनेची व्याप्ती संदर्भात सतत होत असलेल्या घोषणा आणि चर्चा तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्जमाफीची आशा याचा परिणाम शेती कर्ज वसुलीवर झाला आहे. कर्जफेडीऐवजी कर्ज थकीत ठेवण्याकडे कल वाढला आहे. जिल्हा बँकेकडील ८१ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. ५४४ कोटी ३२ लाखांचे शेतीकर्ज थकीत आहे. यामध्ये अल्पमुदत पीककर्ज तसेच मध्यम व दीर्घ मुदत शेती कर्जाचा समावेश आहे.  शेती कर्जाची सर्वाधिक थकबाकी जत तालुक्यात आहे. जत तालुक्यातील १९ हजार ८५८ शेतकऱ्यांचे १४२ कोटींचे कर्ज थकीत आहे. तासगाव तालुक्यातील ११ हजार ७०३ शेतकऱ्यांचे १०७ कोटी रुपये थकीत आहेत. मिरज तालुक्यातील १० हजार ५८७ शेतकऱ्यांचे ८० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. 

वसुलीची मुदत उरली दोन दिवस पीककर्ज वसुलीची मुदत दि. ३० जूनपर्यंत असते. ही मुदत संपण्यास आता अवघे दोन दिवस उरले आहेत. मात्र, सभासद पातळीवर केवळ ३५ टक्केच कर्जवसुली झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर   कर्जमाफीच्या आशेने बहुसंख्य शेतकऱ्यांचा कल कर्ज परतफेड न करण्याकडे दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून थकीत शेती कर्जाच्या रकमेत आणखी वाढ होण्याची भीती आहे.  .. तर १२.५० टक्के व्याज आकारणी शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पीककर्ज ६ टक्के व्याजाने मिळते. वेळेत परतफेड केल्यास हे कर्ज शून्य टक्के व्याजाने मिळते. केंद्र शासन, राज्य शासन आणि जिल्हा बँकेच्या निधीतून व्याज परतावा मिळतो. मात्र, मुदतीत कर्जफेड न केल्यास संबंधित शेतकरी आणि कर्जखाते थकबाकीत जाते व त्यानंतर या कर्जास १०.५० टक्के व्याजदर आणि २ टक्के दंडव्याज अशी एकूण १२.५० टक्के व्याज दराने आकारणी सुरू होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crisis: सात राज्यांत खरीप धोक्यात; ‘आरबीआय’च्या मासिक अहवालातील नोंदी

Turmeric Price: नांदेडच्या नवा मोंढ्यात हळदीचा भाव २५ हजारांपार; सोयाबीनलाही ७ हजारांचा दर!

Maharashtra Climate Update: उत्तर कोकणात उष्ण, दमट हवामान शक्य

Sugarcane Rate: ऊसदरावर तोडगा नाही, पहिली उचल ४,५०० रुपये द्या, राजू शेट्टींची मागणी

Stress in Turmeric Crop: दुष्काळाचा हळद पिकाला फटका; फुटवे वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाचवण्यासाठी काय कराल?

SCROLL FOR NEXT