488 people benefit from 'Kadbakutti' device 
मुख्य बातम्या

नगर : ‘कडबाकुट्टी’ यंत्राचा ४८८ जणांना लाभ

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत अनुदान योजनेतून नगर जिल्ह्यातील ४८८ शेतकऱ्यांना कडबाकुट्टीचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून यंदा त्यासाठी ४४ लाखांची तरतूद केली आहे.

Suryakant Netke

नगर ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत अनुदान  योजनेतून नगर जिल्ह्यातील ४८८ शेतकऱ्यांना कडबाकुट्टीचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून यंदा त्यासाठी ४४ लाखांची तरतूद केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना कडबाकुट्टी खरेदीसाठी किमतीच्या ५० टक्के म्हणजे नऊ हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. यंदा जिल्हा परिषदेने कृषी विभागासाठी १ कोटी ७० लाखाची मूळ तरतूद केली होती. मात्र कोरोनामुळे निधीची कमतरता असल्याने पुनर्विनियोजनात ९४ लाखांची कपात केली आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यासाठी स्वनिधीतून तरतूद केली जाते. यंदा मात्र कोरोनाची स्थिती असल्याने निधीत कपात करावी लागली आहे. शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर (९ हजार) कडबाकुट्टीचा लाभ दिला जातो. दरवर्षी कडबाकुट्टीला मागणी अधिक असते. त्यामुळे वाटप करताना पदाधिकारी व अधिकाऱ्यांना कसरत करावा लागते. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे योजनांवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. यंदा १३ पैकी ८ योजनांच्या निधीत कपात केली आहे. यंदा कडबाकुट्टीच्या मूळ तरतुदीत १६ लाखांची कपात केली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला ७५ हजार रुपयांचा शेती उपयोगी साहित्य दिले जाते. यंदा त्यासाठी सहा लाखांची तरतूद करत चार लाख कपात केले. बायोगॅस संयंत्र उभारणी प्रोत्साहन अनुदान, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी सौर विद्युतनिर्मिती संयंत्र उभारण्याच्या अनुदानासाठी प्रत्येकी सहा लाख तर ग्रामपंचायतीला शववाहिनी उभारणीसाठी अनुदान रकमेत चार लाख कपात केली आहे. 

याशिवाय शेतीगोदाम दुरुस्ती, देखभाव व भाडे, शेतकरी मेळावे शेतकरी पुरस्कार सोहळा, इलेक्ट्रिक मोटार अनुदान, पीव्हीसी पाइप संच, सेंद्रिय शेती प्रोत्साहन अनुदान या योजनांसाठी तरतूदच केली नाही. यंदा जिल्हा परिषदेने कृषी विभागासाठी १ कोटी ७० लाखांची मूळ तरतूद केली होती. मात्र कोरोनामुळे निधीची कमतरता असल्याने पुनर्विनियोजनात ९४ लाखांची कपात केली आहे.  

पुनर्विनियोजनातील तरतूद (कंसात मूळ तरतूद) 
शेतकऱ्यांना कडबाकुट्टी मशिनसाठी किमतीच्या ५० टक्के अर्थसाह्य ४४ लाख (६० लाख)
आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला शेतीउपयोगी साहित्य देणे ६ लाख (१० लाख)
बायोगॅस सयंत्र उभारणी प्रोत्साहन अनुदान ९ लाख (१५ लाख)
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी सौर विद्युतनिर्मिती सयंत्र उभारणे ९ लाख (१५ लाख)
ग्रामपंचायतीला शववाहिनी उभारणीसाठी शंभर टक्के अनुदान ६ लाख (१० लाख) 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

Agriculture Mechanization : टिलरने वाढले शेतकऱ्यांचे बळ

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

SCROLL FOR NEXT