1.13 crore for Kandalvan livelihood creation scheme 
मुख्य बातम्या

कांदळवन उपजीविका निर्माण योजनेसाठी १.१३ कोटी

रत्नागिरी ः जिल्ह्यातील २ हजार ४३२ हेक्टर शासकीय कांदळवन क्षेत्रामार्फत कांदळवन उपजीविका निर्माण योजना राबविली आहे. यामध्ये शोभिवंत मत्स्यपालनाची नऊ युनिट, कालवेपालनाची नऊ युनिट, आठ गावांमध्ये खेकडापालन, तर पिंजऱ्‍यातील मत्स्यपालनाच्या सहा प्रकल्पांतून ग्रामस्थांना रोजगाराचे साधन दिले जाणार आहे.

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः जिल्ह्यातील २ हजार ४३२ हेक्टर शासकीय कांदळवन क्षेत्रामार्फत कांदळवन उपजीविका निर्माण योजना राबविली आहे. यामध्ये शोभिवंत मत्स्यपालनाची नऊ युनिट, कालवेपालनाची नऊ युनिट, आठ गावांमध्ये खेकडापालन, तर पिंजऱ्‍यातील मत्स्यपालनाच्या सहा प्रकल्पांतून ग्रामस्थांना रोजगाराचे साधन दिले जाणार आहे. त्यासाठी कांदळवन कक्षाने १ कोटी १३ लाख ९ हजार ५०० रुपयांचा निधी वाटप केला.

कांदळवनांच्या ठिकाणी निसर्ग चक्रीवादळाचा वेग मंदावला आणि किनारी भागातील गावांना वादळाचा कमी फटका बसला. कांदळवने ही चक्रीवादळ आणि त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक संकटांमध्ये ‘जैविक भिंत’ म्हणून काम करतात. जिल्ह्याच्या १६० किलोमीटरच्या किनारी भागात खारफुटीच्या जवळपास २० प्रजाती वनस्पती आहेत. पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कांदळवनांचे लोकसहभागातून संरक्षण करण्यासाठी वनविभाग, कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. त्यासाठी कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना राबविली जात आहे. 

शोभिवंत मत्स्यपालन हा प्रकल्प जिल्ह्यातील ६ गावांमध्ये राबविण्यात आला. आडे गावात ४ युनिट, रत्नागिरी तालुक्यातील मयेकरवाडी, भंडारवाडा, वरवडे येथे प्रत्येकी १, राजापूरमध्ये सागवे खुर्द, धाऊलवल्ली आणि गुहागर तालुक्यात तवसाळ या गावांत १ अशी नऊ युनिट सुरू करण्यात येतील. प्रत्येक युनिटला ४ लाख ११ हजार ५०० रुपये इतका निधी गावातील कांदळवन सहव्यवस्थापन समितीला देण्यात आला.

कालवेपालन प्रकल्पासाठी अणसुरे, जानशी, धाऊलवल्ली, जुवै जैतापूर, बुरंबेवाडी व रत्नागिरी तालुक्यातील गावखडी या सहा गावांमध्ये सुरू करण्यात आला. प्रतियुनिट ३८ हजार रुपये निधी दिला आहे. पिंजऱ्‍यातील मत्स्यपालनाच्या प्रकल्पासाठी ३ लाख २२ हजार रुपये निधी प्रतियुनिट दिला आहे. खेकडापालन प्रकल्प जिल्ह्यातील ८ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये मालगुंड, राई, पावस, भंडारवाडा (वरवडे), गडनरळ, जानशी व सागवे खुर्द आणि मुर्डी या गावांचा समावेश आहे.

१९ गावांत समितींची स्थापना

किनारपट्टी आणि खाडी भागालगत खारफुटी असलेल्या गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समित्यांची स्थापना केली. या गावांमध्ये कांदळवन परिसंस्थेच्या महत्वाबाबत जनजागृती करण्यात येते. या योजनेंतर्गत १९ गावांमध्ये प्रकल्पनिहाय निधी देण्यात आला आहे. यासाठी राजापूर ७, रत्नागिरी ७, गुहागर १, खेड १, दापोली ३ गावांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: जमीन खरडून गेलेल्यांना सरसकट दिलासा नाहीच

FPC Loan Proposal: ‘एफपीसीं’चे कर्जप्रस्ताव बॅंकांनी रखडवले

Soybean Price: हमीभावापेक्षा ११२८ ते १७२८ रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी

Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे

SCROLL FOR NEXT