Pune News: राज्यातील अडीचशेहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (एफपीसी) कर्जप्रस्ताव विविध बॅंकांनी अडवून ठेवले आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामपरिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातून होणारे अनुदानवाटपदेखील रखडले आहे. .स्मार्ट प्रकल्प मुख्यत्वे कृषी मूल्यसाखळी विकासासाठी सुरू करण्यात आला आहे. यात ‘उत्पादक भागिदारी उपप्रकल्प’ व ‘बाजार संपर्कवाढ उपप्रकल्पां’चा समावेश आहे. त्याचा लाभ ‘समुदाय आधारित संस्था’ (सीबीओ) घेऊ शकतात. ‘सीबीओ’ म्हणून राज्यातील ‘एफपीसी’देखील ‘स्मार्ट’मधून ६० टक्के अनुदान प्राप्त करण्यास पात्र ठरतात..Crop Loan : पीक कर्जवाटपात ९०० कोटींची घट.त्यामुळे शेकडो ‘एफपीसीं’नी स्मार्टकडे प्रस्ताव दिले. मात्र प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के अनुदान हवे असल्यास आधी १० टक्के स्वहिस्सा भरावा; तसेच, ३० टक्के कर्ज काढावे लागेल, अशा अटी ‘स्मार्ट’च्या नियमावलीत आहेत. यात स्वहिस्सा निधी जमा करण्यात एफपीसींना यश येत असले तरी कर्जअटीची पूर्तता करताना मात्र पुरती दमछाक होते आहे..कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की बॅंकांनी पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे ४५० बॅंकांचे कर्जप्रस्ताव मंजूर झाले. परंतु शेवटच्या टप्प्यात बॅंकांनी एफपीसींकडे साफ दुर्लक्ष केले आहे..Farmer Loan Waiver: संपूर्ण कर्जमाफी, ५० हजार एकरी मदतीसाठी शेतकरी आणि शेतमजूरांचे राज्यभर आंदोलन.बॅंकांनी प्रस्ताव रखडविल्यामुळे स्मार्टमधून अनुदानाचा पहिला हप्ता मिळवण्यात एफपीसी अपयशी ठरल्या आहेत. ‘कर्जदार म्हणून पुढे आलेल्या एफपीसी अगदीच नव्या आहेत. त्यांची कागदोपत्री आर्थिक उलाढाल काहीही दिसत नाही. त्यामुळे आम्ही कर्ज मंजूर केल्यास ते वसूल न होण्याचा धोका अधिक आहे,’ अशी भूमिका बॅंका घेत आहेत..मात्र, स्मार्टकडून बॅंकांची समजूत काढली जात आहे. ‘एफपीसींकडे अनुदान व स्वहिस्सा मिळून ७० टक्के रक्कम अप्रत्यक्षपणे तयार आहे. बॅंकांनी फक्त ३० टक्के रक्कम द्यायची असल्यामुळे यात जोखीम कमी आहे. त्यामुळे बॅंकांनी अडविलेले प्रस्ताव मंजूर करावेत,’ असे स्मार्टकडून बॅंकर्स मंडळींना सांगितले जात आहे. परंतु, बँकांनी हेकेखोरपणा अद्याप सोडलेला नाही..काही प्रस्ताव वर्षभरापासून पडूनराज्यातील काही बॅंकांमध्ये एफपीसींचे प्रस्ताव तब्बल एक वर्षांपासून पडून आहेत. प्रस्ताव मंजूर होऊ नये म्हणून ठराविक कालावधीनंतर वेगवेगळ्या अटींवर बोट ठेवले जाते. एक अट पूर्ण होताच दुसऱ्या अटींबाबत विचारणा केली जाते. यामुळे एफपीसी हैराण झाल्या असून काही एफपीसींनी, ‘आम्हाला अनुदानही नको आणि बॅंकांकडून होणारा जाचही नको,’ अशी भूमिका घेतली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.