Farmer-Scientist Dialogue on Natural Agriculture at Krishi Vigyan Kendra
Farmer-Scientist Dialogue on Natural Agriculture at Krishi Vigyan Kendra 
मुख्य बातम्या

सोलापूर ः कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती  विषयावर शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः नैसर्गिक शेतीवर सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकरी- शास्त्रज्ञ सुसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीच्या उपयुक्ततेबद्दल तज्ज्ञांनी या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  राष्ट्रीय स्तरावरील सेंद्रिय शेती मेळाव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नैसर्गिक शेती या विषयावरील मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. तसेच या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्रातील स्वच्छता पंधरवड्याचे (१६ ते ३१ डिसेंबर २०२१) उद्‍घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूरचे प्रतिनिधी डॉ. विकास लोंढे, तालुका कृषी अधिकारी सौ. मनीषा मिसाळ, कृषिभूषण नागेश नन्नवरे, शिवराज कोटगी इत्यादी उपस्थित होते.  या वेळी सेंद्रिय शेतीबाबत बोलताना नागेश ननवरे म्हणाले, ‘‘सेंद्रिय शेतीसाठी आधी देशी गाई सांभाळणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून पिकांना आवश्यक असणाऱ्या निविष्ठा आपल्याला मिळतात. सेंद्रिय शेतीचे तंत्र सोपे आणि सुलभ आहे. या पद्धतीमुळे पिकांचा खर्च आणि एकूण उत्पन्न यामध्ये नक्कीच फरक दिसून येतो  तर प्रगतिशील शेतकरी शिवराज कोटगी, यांनी द्राक्ष शेतीमध्ये सेंद्रिय शेतीपद्धतीचा होत असलेल्या उपयोगांबद्दल माहिती दिली. डॉ. व्ही. एम. लोंढे यांनी मातीचे आरोग्य व त्याची काळजी आणि सेंद्रिय शेती मध्ये त्याचे महत्त्व कसे आहे, हे पटवून सांगितले.’’ श्री. कवडे आणि सौ. मिसाळ यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. तांबडे यांनी केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT