Selling fertilizer at extra rate from fertilizer seller at Lasalgaon 
मुख्य बातम्या

लासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा दराने खत विक्री

नाशिक: खतांचा तुटवडा असल्याने काही विक्रेत्यांकडून जादा दराने खत विक्री होत असल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी खत विक्री दुकानांच्या तपासण्या करण्यात आल्या.

टीम अॅग्रोवन

नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही ठिकाणी खतांचा तुटवडा असल्याने काही विक्रेत्यांकडून जादा दराने खत विक्री होत असल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी खत विक्री दुकानांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात लासलगाव (ता.निफाड) येथील कृषी मित्रा अॅग्रो आणि भंडारी ब्रदर्स हे दोन्ही खत विक्रेते शेतकऱ्यांना जादा दराने खतविक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या भरारी पथकाने या दोघा खत विक्रेत्यांना विक्री बंद करण्याचे आदेश देत संबंधितांवर कारवाई केली.  शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत जादा दराने खत विक्री करण्याचा प्रकार लासलगाव येथे आढळून आल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रकार उजेडात आला आहे. यामुळे या दुकानदारांना खत विक्री बंद करण्याचे आदेश दिले. यावेळी नाशिक विभागीय तंत्र अधिकारी (गुणवत्ता)संजय शेवाळे,विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जितेंद्र पानपाटील, मोहीम अधिकारी अभिजित जमधडे,जिल्हा गुणवत्ता व नियंत्रण निरीक्षण अभिजित घुमरे यांनी ही कारवाई केली आहे.  खते खरेदीची पक्के बिले घ्यावीत  जादा दराने खतांची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनी अनुदानित खते घेताना इ-पॉझमधून बिलाची मागणी करावी, खते खरेदीचे पक्के बिले घ्यावीत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी केले आहे.     

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT