Foodgrain Production 
मुख्य बातम्या

देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज  

देशात तांदूळ, गहू, मका आणि डाळींच्या उत्पादनामध्ये उच्चांकी वाढ झाल्यामुळे या वर्षीच्या (जून २०२१- जूलै २२२) पीक हंगामात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. २०१६-१७ पासून अन्नधान्याच्या उत्पादनात दरवर्षी विक्रमी वाढ होत आहे.

टीम ॲग्रोवन

देशात तांदूळ, गहू, मका आणि डाळींच्या उत्पादनामध्ये उच्चांकी वाढ (Record Production) झाल्यामुळे या वर्षीच्या (जून २०२१- जूलै २२२) पीक हंगामात अन्नधान्याचे (Foodgrain Production)  विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. २०१६-१७ पासून अन्नधान्याच्या उत्पादनात दरवर्षी विक्रमी वाढ होत आहे. ज्यामुळे भारताला जगातील प्रमुख १० कृषी निर्यातदार देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. याशिवाय अन्नसुरक्षा (Food Security) निश्चित करण्यासाठी अन्नधान्यावरील अनुदानातही दरवर्षी वाढ होत आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी (ता.१६) पीक उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज (Second Advance Estimate) जाहीर केला. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, चालू वर्षी देशात तीन हजार १६० लाख टन अन्नधान्य उत्पादन (Production Of Foodgrain) होणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये खरीपातील १ हजार ५३५ लाख आणि रब्बी हंगामातील १ हजार ६२५ लाख टन उत्पादनाचा समावेश आहे. खरीप उत्पादनात २ टक्के वाढीचा अंदाज असून रब्बीतील अन्नधान्याच्या उत्पादनात १.५ टक्के वाढीचा अंदाज आहे. एकूणच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादनात १.७ टक्क्यांची वाढ दिसत आहे.  

.@AgriGoI releases the second advance estimates of production of major crops for the year 2021-22 Record foodgrains production of 316.06 million tonnes estimated in the country Read: https://t.co/NrcGbse0Uk pic.twitter.com/cc87tO7Bo8

— PIB India (@PIB_India)

पीकनिहाय उत्पादन - ताज्या अंदाजानुसार, यंदा गव्हाचे उत्पादन (Wheat Production) १ हजार ११३ लाख टन होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या १ हजार ०९५ लाख टनांच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात घट होऊनही उत्पादनात १.६ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा तांदूळ उत्पादन (Rice Production) एक हजार २८३ लाख टन होण्याचा अंदाज आहे. ज्यामध्ये खरीपातील एक हजार ०९५ लाख आणि रब्बीतील १८३.९ लाख टन उत्पादनाचा समावेश असून मागील वर्षाच्या एक हजार २४३ लाख टनांच्या तुलनेत यंदा उत्पादनात २.९ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर मका उत्पादन (Maize Production) २.४ टक्क्यांनी वाढून ३२४.२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. तसेच हरभरा उत्पादनात (Cheakpea Production) १०.२ टक्क्यांच्या वाढीसह १३१.२ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. एकूण कडधान्य उत्पादनात ५.९ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून ते २५४.६ लाख टनांवरून २६९.६ लाख टन होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा - जीएम पिकांसाठी महाराष्ट्रात पुन्हा चळवळ ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर आणि मूग अशी पिके आहेत जिथे उत्पादनात किरकोळ घट होण्याचा अंदाज आहे. सरकार या श्रेणीतील पिकांच्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या उत्पादनात झालेली घट योग्य नसल्याची प्रतिक्रिया कृषी अर्थतज्ज्ञ एन.बी सिंह यांनी बिझनेसलाईनशी बोलताना व्यक्त केली आहे. तूर उत्पादन घटणार - गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन ४३.२ लाख टन होते. यंदा त्यात घट झाली असून ते ४० लाख टनांवर आले आहे. तर मूगाचे उत्पादन (Moong Production) ३०.९ लाख टनांवरून ३०.६ लाख टन झाले आहे. याशिवाय ज्वारीच्या उत्पादनातही घट होऊन ४८.१ लाख टनांवरून ४३.१ लाख टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तसेच बाजरी १०८.६ लाख टनांवरून ९२.२ लाख टन आणि नाचणीचे उत्पादन २० लाख टनांवरून १६.७  लाख टनांवर घसण्याचा अंदाज आहे.     तेलबिया उत्पादनात वाढ - मोहरीच्या उत्पादनातील (Mustard Production) मजबूत वाढीमुळे तेलबियांचे एकूण उत्पादन (Oilseed Production) ३७१.५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. जे गेल्यावर्षी ३५९.५ लाख टन होते. भुईमुगाचे (Graundnut) उत्पादन गेल्या वर्षीच्या १०२.४ लाख टनांच्या तुलनेत किंचित घटून ९८.६ लाख टन होण्याची शक्यता आहे. तर सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीच्या १२६.१ लाख टनाच्या तुलनेत १३१.२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. तसेच मोहरी उत्पादन मागील वर्षीच्या १०२.१ लाख टनांच्या तुलनेत यंदा ११४.६ लाख टन होण्याची शक्यता आहे. यंदा उसाच्या उत्पादनातही (sugarcane Production) वाढीचा अंदाज नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या चार हजार ५० लाख टनांच्या तुलनेत यंदा उसाचे उत्पादन चार हजार १४० लाख टन होण्याचा अंदाज आहे.उसाप्रमाणे कापूस उत्पादनातही (Cotton Production) घटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या ३५२.५ लाख गाठींच्या (प्रत्येकी १७० किलो) तुलनेत यंदा ३४०.६ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT