पंचमहाल डेअरीकडून सुरक्षेत बेपर्वाई? 
मुख्य बातम्या

पंचमहाल डेअरीकडून सुरक्षेत बेपर्वाई?

प्लॉटनुसार मार्जिन किती ठेवायचे हे ठरलेले आहे. तळोजा एमआयडीसीतील पंचामृत डेअरीचा प्लॉट मोठा आहे, त्याचा विचार करता बायो-मिथानेशन प्लांटच्या समोर नऊ मीटर आणि बाजूला सहा मीटर अंतर आवश्यक आहे. - राजेंद्र बलगमवार, सिक्युरिटी इंजिनिअर, तळोजा एमआयडीसी.

मारुती कंदले

मुंबई : ‘अमूल’च्या अधिपत्त्यातील पंचमहाल (पंचामृत) दूध डेअरीची नवी मुंबईतील डेअरीत सुरक्षिततेच्या मुद्यावरून बेपर्वाई होत आहे. डेअरीतील बायो-मिथानेशन प्लांटच्या उभारणीत फॅक्टरी ॲक्ट आणि फायर अँड सेफ्टी ऑडिटच्या नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. 

याबाबत प्राप्त माहितीनुसार, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार प्रक्रिया केल्याशिवाय सांडपाणी थेट नाल्यात सोडता येत नाही. त्यासाठी पंचमहाल डेअरीत बायो-मिथानेशन प्लांट उभारण्यात आला आहे. दररोज दोन लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करता येईल इतका मोठा हा प्रकल्प आहे. प्रकल्पाअंतर्गत बायो-मिथानेशन रिअॅक्टर, मिथेन गॅस होल्डिंग टँक, गॅस कॉम्प्रेशन युनिट आणि मिथेन गॅस जाळून टाकणारी चिमणी बसवली आहे. 

डेअरीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर यात तयार होणारा मिथेन वायू चिमणीद्वारे (फ्लेअर स्टॅक) जाळून टाकला जातो. तर प्रक्रियायुक्त सांडपाणी नाल्यात सोडले  जाते.  नियमाप्रमाणे प्लांटच्या आजूबाजूला सहा मीटर आणि कॉर्नरच्या ठिकाणी नऊ मीटर मोकळी जागा आवश्यक आहे. अपघातप्रसंगी अग्निशामक गाडीला आतमध्ये फिरता यावे हा हेतू त्यामागे आहे. इथे हा प्लांट कंम्पाउंडच्या भिंतीपासून एक मीटरच्या अंतरावर उभा आहे. मिथेन गॅस होल्डिंग टँक आरसीसी आहे, मिथेन हा वायू ज्वलनशील असल्याने ही बाब चिंतेची आहे. प्लांट रस्त्याकडेला उभा आहे, या अनुषंगाने काही दुर्घटना झाल्यास परिसरास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

दरम्यान, या अनुषंगाने दै. सकाळ-अॅग्रोवनकडून पंचमहाल डेअरीच्या तळोजा येथील व्यवस्थापनाशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्यात आला. मात्र, भ्रमणध्वनी तसेच ई-मेलवरील प्रश्नांनाही डेअरी व्यवस्थापनाने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या विषयावर डेअरी व्यवस्थापनाची नेमकी भूमिका काय आहे ते समजू शकलेले नाही.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT