Crop Insurance Agrowon
मुख्य बातम्या

Crop Insurance : 'पीकविमा'साठी एक रुपयांपेक्षा जास्त घेणाऱ्या ‘सीएससी’ केंद्रांवर कारवाई होणार

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : शासनाने खरीप सन २०२३- २४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेत शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा नोंदणी केली जाते. मात्र, सीएससी चालक शेतकऱ्यांकडून १०० ते ३०० रुपये आकारत आहेत.

Team Agrowon

Crop Subsidy Insurance Scheme : राज्यात पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून एक रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेणाऱ्या सार्वजनिक सुविधा (सीएससी) केंद्रांवर कारवाई करा, अशा सूचना कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पीकविमा योजनेतील शुल्क आकारणीबाबत गेल्या काही दिवसांत कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्याची ही दुसरी वेळ आहे. सीएससी केंद्रांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित आहे. पीकविम्यासाठी केवळ एक रुपया शुल्क शेतकऱ्यांकडून घ्यावे, असे आदेश राज्य शासनाने वारंवार जारी केल्यानंतरही सीएससीचालक ऐकण्यास तयार नाहीत. विमा अर्ज भरून देण्यासाठी दलालांचा झालेला सुळसुळाट आणि सीएससी चालकांची मनमानी शेतकऱ्यांना हैराण करीत आहे. याबाबत ‘अॅग्रोवन’मधून सातत्याने वाचा फोडली जात आहे.

कृषी आयुक्तांनी ११ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात कडक भूमिका घेतली आहे. ‘‘सीएससी केंद्रांवर एक रुपयापेक्षा अधिक शुल्क घेतले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी या केंद्रांवर, ग्रामपंचायतींवर तसेच बाजार समितीच्या ठिकाणी माहिती फलक लावावेत. कोणताही सीएससीचालक गैरवर्तणूक करीत असल्यास कायदेशीर कारवाई करा आणि त्याचा अहवाल मला पाठवा,’’ असे आदेश या पत्रात देण्यात आले आहेत.

सीएससीचालकांना प्रत्येक अर्ज भरण्यासाठी विमा कंपनीकडून ४० रुपये दिले जातात. मात्र सीएससी केंद्रांवर जादा शुल्क घेतले जाते. याबाबत कृषिमंत्र्यांकडे तक्रारी गेल्या. त्यांनी या प्रकाराबाबत कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. चालू खरिपात पीकविमा योजनेची अंमलबजावणी करण्याचे कंत्राट ९ विमा कंपन्यांनी घेतले आहे. मात्र या कंपन्यांनी गावोगावी जागृती केलेली नाही. त्यामुळे आधीसारखेच दलालांमार्फत तसेच सीएससी चालकांना भरमसाट पैसे मोजून पीकविमा अर्ज भरण्याचे प्रकार चालू आहेत. अर्ज भरण्यासाठी १०० रुपयांपासून ते अगदी एक हजार रुपयांपर्यंत अवैध शुल्क घेतले जात असल्याचे कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT