Fake Seeds agrowon
मुख्य बातम्या

Fake Seeds : बोगस बियाणे कारखान्यावर छापा; वर्धा आणि नांदेडमध्ये अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

Action On Bogus Seed : वर्धा येथे बोगस बियाणांचे रिपॅकिंग करून त्याची विक्री करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. यात पोलिसांनी दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर नांदेडमध्ये बोगस बियाणे घेऊन जाणारा ट्रक जप्त केला आहे.

Team Agrowon

Bogus seeds : खरीप हंगामाच्या पेरणीची सर्वत्र लगबग सुरू आहे. अशात अनेक शेतकरी बाजारात बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यात अनेक ठिकाणी बियाणांचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहे. कृषी विभागाकडून कारवाई सुरू आहेत. दरम्यान, बोगस कापूस बियाणे रिपॅकिंग करुन त्याच्या विक्रीच्या तयारीत असलेल्या एका कारखान्यावर वर्धा पोलिसांनी छापा टाकून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खरीप हंगामाच्या पेरणीची सर्वत्र लगबग सुरू आहे. अशात अनेक शेतकरी बाजारात बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यात अनेक ठिकाणी बियाणांचा काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहे. बनावट खते आणि बियाणांवर कृषी विभागाकडून कारवाई सुरू आहेत. दरम्यान, बोगस कापूस बियाणे रिपॅकिंग करुन त्याच्या विक्रीच्या तयारीत असलेल्या एका कारखान्यावर वर्धा पोलिसांनी छापा टाकून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्ता केला आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत म्हसाळा येथे एका ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. पोलीस, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी रात्रीपासून घटनास्थळावर दाखल झाले. या छाप्यात 1 कोटी 51 लाख 82 हजाराचा मोद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणआंना ताब्यात घेतले आहे.

गुजरातमधून बिटी कपाशीचे बियाणे आणून त्याचे वर्ध्यात रिपॅकिंग करीत होते. त्यानंतर कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये त्याची विक्री केली जात असल्याची माहिती संशयित आरोपींनी दिली. वर्ध्याचे पोलीस नुरल हसन यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातही कृषी विभागाने बोगस बियाणे कारवाई करण्यात आली. नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बनावट सोयाबीन विक्रीसाठी घेऊन जाणार ट्रक पकडण्यात आला. यामध्ये पोलिसांनी ९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT