Bogus Cotton Seed : कपाशीच्या बनावट बियाण्याची ९५५ पाकिटे जप्त

Cotton Seed Update : परभणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पथकाने एका वाहनाव्दारे मानवत येथे विक्रीसाठी आलेली एका खासगी कंपनीच्या कपाशीच्या एका वाणाच्या बनावट बियाण्याची ९५५ पाकिटे जप्त केली.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon
Published on
Updated on

Parbhani Cotton News : परभणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पथकाने एका वाहनाव्दारे मानवत येथे विक्रीसाठी आलेली एका खासगी कंपनीच्या कपाशीच्या एका वाणाच्या बनावट बियाण्याची ९५५ पाकिटे जप्त केली.

याप्रकरणी पंचायत समितीच्या बियाणे निरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून मानवत पोलिस ठाण्यात ४ व्यक्तीविरुद्ध शनिवारी (ता. १०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलशी सीड्स लिमिटेड या कंपनीच्या तुळसी १४४ बीजी ll कबड्डी या वाणांच्या बनावट बियाण्याची पाकिटे विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी डी. डी. सामाले, कृषी अधिकारी श्रीशंकर बलशेटवार, मानवत पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक किरण सरकटे यांनी मानवत पोलिस ठाण्यातील फौजदार अशोक ताटे, हवालदार नारायण सोळंके यांच्या समक्ष शुक्रवारी (ता. ९) मानवत येथील एका पेट्रोल पंपाजवळ उभ्या वाहन क्रमांक (एमपी ०९, बीसी ८८७२) या वाहनांची तपासणी केली असता संशयित बनावट बियाण्याची पाकिटे आढळून आली.

Cotton Seed
Cotton Market : परभणीत कापसाला क्विंटलला सरासरी ७ हजार रुपये दर

त्यामुळे ते वाहन पोलिस ठाण्यात आणले. पंचासमक्ष बियाण्याच्या ९५५ पाकिटांची तपासणी केली. प्रत्येक पाकिटावर लेबल क्र. भिन्न (वेगळा) असणे आवश्यक होते परंतु सर्व पाकिटावर लेबल क. एकच आढळून आले.

याप्रकरणी पडताळणीसाठी शनिवारी (ता. ११) तुलसी सीड्स प्राइवेट लिमिटेड कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर संजय खिल्लारे (परभणी) व जीवन सरडे (जालना) यांनी मानवत पोलिस ठाण्यात ही पाकिटे बनावट असल्याचा जबाब नोंदविला.

याप्रकरणी बियाणे निरीक्षक किरण सरकटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बियाण्याचे उत्पादन साठवणूक वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी या बियाण्याचे उत्पादक, साठवणुकदार, विक्रेते सरोज तिवारी (रा. अमेठी, उत्तर प्रदेश), वाहतूकदार लामेश पाटील, तुषार पाटील, मोहित इंगळे (तिघे रा. मध्य प्रदेश) यांच्या विरुद्ध मानवत पोलिस ठाण्यात शनिवारी(ता. १०) दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला.

या पाकिटाचे दोन नमुने तपासणीसाठी काढण्यात आले. जप्त केलेली पाकिटे आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com