विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस ! पीक नुकसानीने शेतकरी हतबल !! agrowon
मुख्य बातम्या

Crop Insurance : पीक विमा योजनेसंबधी शेतकऱ्याने लिहीले पंतप्रधानांना पत्र

Pradhan Mantri Kharip Pik Vima Yojana : राज्यात शेतकऱ्यांवर पावसाचे संकट आले असताना राज्य सरकारने 'सर्वसमावेशक पीक विमा' योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा काढता येणार आहे.

Team Agrowon

PMFBY : एक रुपयात पीकविमा योजनेचा गाजावाजा सध्या होत आहे. मात्र गेल्या हंगामात हजारो रुपयांचा भरणा करून नुकसानाअंती देखील विमा कंपनीकडून भरपाई मिळाली नाही. परिणामी कंपनीला निर्देश देत भरपाईस बाध्य करावे, अशी मागणी प्रवीण ठाकरे या शेतकऱ्याने थेट पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा याकरिता शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून यंदा शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी केवळ एक रुपयांचा भरणा करावा लागणार आहे. मात्र गेल्या हंगामापर्यंत हजारो रुपयांचा विमा हप्ता भरूनही कंपन्यांकडून भरपाईस टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे एक रुपयांच्या विमा हप्त्यातून कंपन्यांच्या भरपाई देण्याच्या हेतूवरच शंका व्यक्‍त केली जात आहे. अशातच एका प्रकरणात गेल्या हंगामात सातत्याने पाठपुरावा करूनही एका शेतकऱ्याला भरपाई देण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे.

प्रवीण दिवाकर ठाकरे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते धामणगाव वाठोडा येथील रहिवासी आहेत. त्यांनी गेल्या हंगामात कापूस व सोयाबीन पिकाचा विमा उतरविला होता. या पिकाचे नुकसान झाल्याने त्यांनी नियमानुसार ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीला सूचना दिली. त्याची कोणतीच दखल कंपनीकडून घेण्यात आली नाही. शेतात येत नुकसानीचा पंचनामा करण्याचेही टाळण्यात आले. माहिती अधिकारातून त्यांनी भरपाई न मिळण्यामागील कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्याने नुकसानीची तक्रारच केली नसल्याचे कळविण्यात आले. यामुळे संतप्त शेतकऱ्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. परिणामी पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांना कोणता फायदा, असा प्रश्‍न प्रवीण ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी हिताऐवजी कंपनी हिताला विमा योजनेत प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करीत त्यांनी थेट पंतप्रधानांना या प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT