Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेत ६६ लाख शेतकऱ्यांचा सहभाग ; ३१ जुलै अर्ज करण्याची शेवटची मुदत

Agriculture Commissioner : राज्यात पेरणीच्या कामास वेग आला आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरु झाली आहेत. पावसाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
पीकविम्याची मुदत वाढवा  Extend the term of crop insurance
पीकविम्याची मुदत वाढवा  Extend the term of crop insurance

PM Pik Vima Yojana in Maharashtra  : राज्यात अनेक भागांमध्ये माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. ज्या ठिकाणी सुरुवातील पावसाला सुरुवात झाली, त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु आता त्यांच्यावर दुबार पेरण्याचे संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने सुरू केलेल्या १ रुपयात पीक विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  आजपर्यंत 66 लाख 5 हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी दिली.

पीकविम्याची मुदत वाढवा  Extend the term of crop insurance
Crop Insurance Document : १ रुपयात पीक विमा काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत जाणून घ्या?

माॅन्सूनच्या पावसाने यंदा उशीर केला आहे. राज्याचे 1 ते 17 जुलैपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान 389.1 मिमी असून यावर्षी आत्तापर्यंत 294.60 मिमी म्हणजे सरासरीच्या 76 टक्के पाऊस झाला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत राज्यामध्ये 52 तालुक्यांमध्ये 25 ते 50 टक्के, 136 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के तर 109 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे. तर 58 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, त्याठिकाणी शेती कामांना वेग आला आहे. मात्र, अन्य काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पीकविम्याची मुदत वाढवा  Extend the term of crop insurance
Crop Insurance News : ...अखेर सरकारने आदेश काढला, आता फक्त १ रुपयात मिळणार पीक विमा

त्यामुळे खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून आजपर्यंत 88.44 लाख हेक्टरवर (62 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी आयुक्तांनी दिली.

कापूस व सोयाबीनची 83 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीच्या कामास वेग आला आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरु झाली आहेत. राज्यात विमा संरक्षित क्षेत्र 42.30 लाख हेक्टर आहे. आजपर्यंत 66 लाख 5 हजार शेतकऱ्यांनी एक रुपया पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलैपर्यंतची आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावं असं आवाहनही कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com