केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०१८-२०१९ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास ( RKVY ) योजने अंतर्गत इन्नोव्हेशन अँड ॲग्री-आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि व्यावसायिक कल्पना मूळ धरेपर्यंत मार्गदर्शन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नुकतेच राज्यसभेत उपस्थित लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार देशातील कृषी क्षेत्रातील कामगारांची संख्या ६.१५ कोटी असून देशभरात महिला शेतकऱ्यांची संख्या ३.६० कोटी आहे. कृषी विकासाच्या योजना राबवताना सरकारने या क्षेत्रातील महिलांच्या व्यावसायिक संकल्पनांना चालना देण्याचे काम केले आहे.
व्हिडीओ पहा
केंद्रीय कृषी व शेतकरी मंत्रालयातर्फे या योजनेच्या देशभरातील यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता उत्कृष्ट कामगिरीसाठी पाच नॉलेज पार्टनर्स आणि कृषी व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी २४ मार्गदर्शक नियुक्त करण्यात आले.
त्यादरम्यान देशभरातील १७३ महिला उद्योजक, स्टार्ट अप्सना या इन्नोव्हेशन अँड ॲग्री-आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या माध्यमातून आधार देण्यात आला आहे. याशिवाय भारतीय कृषी संशोधन परिषद (Indian Council of Agriculture Research) ही २०१६-२०१७ सालापासून नॅशनल ॲग्रीकल्चर इन्नोव्हेशन फंडच्या (National Agriculture Innovation Fund) माध्यमातून कृषी आधारित स्टार्ट अप्सना मदत करत आहे.
आतापर्यंत ५० कृषी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले असून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नॅशनल ॲग्रीकल्चर इन्नोव्हेशन फंड अंतर्गत सक्रिय आहेत. संभाव्य महिला उद्योजक, स्टार्ट अप्स या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.