Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market Rate : सोयाबीनचा बाजारभाव ५ हजारांच्या पुढे जाईल का ? दराला नेमका कशाचा आधार मिळेल? 

Soybean Market Update : सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी आणि खाद्यतेल आयात शुल्कात वाढ हे महत्वाचे निर्णय घेतले. मात्र तरीही सोयाबीनचा भाव बाजारभावापेक्षा कमीच आहेत.

Anil Jadhao 

Pune News : सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी आणि खाद्यतेल आयात शुल्कात वाढ हे महत्वाचे निर्णय घेतले. मात्र तरीही सोयाबीनचा भाव बाजारभावापेक्षा कमीच आहेत. त्यातच पुढच्या महिन्यापासून नवा माल बाजारात येईल. तर गेल्या हंगामातील शिल्लक स्टाॅकही यंदा निम्म्याने कमी राहणार आहे. त्यातच परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान केल्यास दराला आधारही मिळू शकतो. 

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने दिलेल्या अंदाजानुसार, नव्या हंगामात सोयाबीनचा शिल्लक स्टाॅक गेल्यावर्षीपेक्षा निम्म्याने कमी राहण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात आधीच्या हंगामातील शिल्लक स्टाॅक २४ लाख टन होता. पण गेल्यावर्षभरात सोयाबीचे गाळप वाढले होते. त्यामुळे शिल्लक स्टाॅक कमी झाला. त्यामुळे नव्या हंगामात सोयाबीनचा शिल्लक स्टाॅक गेल्यावर्षीपेक्षा निम्म्याने कमी होऊन ११ लाख टनांच्या राहील, असा अंदाज सोपाने दिला आहे. 

शिल्लक स्टाॅक कमी राहणार

शिल्लक स्टाॅक कमी राहील्यास नव्या हंगामातील सोयाबीनचा एकूण पुरवठा कमी राहील. हंगामातील एकूण पुरवठा शिल्लक स्टाॅक, उत्पादन आणि आयात माल मिळून बनत असतो. आता शिल्लक स्टाॅकच कमी राहीला तर पुरवठा कमी राहील. तसेच यंदा देशात सोयाबीचा पेरा वाढला आहे. गेल्या हंगामात जवळपास २४ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. त्यात यंदा वाढ होऊन १२५ लाख हेक्टरवर पेरणी झाली. 

पेरा वाढला, उत्पादकतेचे काय?

यंदा गेल्यावर्षीपेक्षा पेरा वाढला. मात्र अनेक भागात सोयाबीन पिकाला बदलते वातावरण आणि पावसाचा फटका बसत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातही सोयाबीन  पिकाला पावसाचा फटका बसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पेरा वाढला तरी उत्पादन वाढीचा शक्यता सध्यातरी कमीच असल्याचे व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहेत. 

पावसाने नुकसानीचा धोका

परतीच्या पावसाचाही फटका सोयाबीन पिकाला बसत असतो. त्यातही चांगला पाऊस राहीलेल्या वर्षात पावसाने नुकसान जास्त असते, हा आजवरचा आपला अनुभव. यंदाही सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने यापुर्वीच दिला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होऊ शकते. नुकसान जास्त झाल्यास उत्पादन कमी होण्याच धोका आहे. 

प्रत्यक्ष खरेदी महत्वाची

सरकार यंदा ४० टक्क्यांच्या दरम्यान हमीभावाने सोयाबीन खेरदी करेल, अशी चर्चा आहे. पण सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सरकारने जास्त सोयाबीन खरेदी केल्यास खुल्या बाजारात सोयाबीनला निश्चितच आधार मिळेल. पण सरकारने खरेदीत दिरंगाई केल्यास बाजारात हवा तसा आधार मिळणार नाही.  

बाजाराला कशाचा आधार मिळेल ? 

शेतकऱ्यांना सोयाबीनला यंदा ६ हजार रुपये भावाची अपेक्षा आहे. पण जर सरकारला खुल्या बाजारात भाव किमान हमीभावाच्या दरम्यान आणायचा असेल तर सरकारला हमीभावाने जास्तीत जास्त खरेदी करावी. जर पिकाचे नुकसान वाढले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढले तर देशातही सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT