Cotton Market
Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market: कापूस बाजार पुन्हा उभारी घेईल का?

Anil Jadhao 

Cotton Market Update पुणेः देशातील बाजारात सध्या कापसाची आवक (Cotton Arrival) वाढलेली आहे. कापूस आवक वाढल्यानं दरावर दबाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात (Cotton Rate) मोठी घट झाली. त्याचा दबाव देशातील बाजारावरही जाणवत आहे.

सध्या देशातील बाजारात ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय. आवकेचा दबाव आहे तोपर्यंत हा दर कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील (Cotton Market) अभ्यासकांनी व्यक्त केला.

दरवर्षी शेतकरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात जास्तीत जास्त कापूस विकतात. पण मागीलवर्षी मार्च महिन्यात कापसाचे भाव ९ हजारांच्या पुढे गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागं ठेवला. पण शेतकऱ्यांनी फेब्रुवारीच्या मध्यापासून कापूस विक्री वाढवली. फेब्रुवारीच्या मध्यापासून देशातील कापूस आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त राहीली, त्यामुळं कापूस दरावर दबाव आला.

मार्च महिना उजाडल्यानंतर कापूस आवक गेल्यावर्षीपेक्षा दप्पट झाली. बाजारावर कापूस आवकेचा दबाव असल्यानं दर दबावात आले. शेतकऱ्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी या काळात दैनंदीन ९० ते एक लाख गाठींपर्यंत कापूस विकला.

मागीलवर्षी याच काळातील विक्री दीड ते दोन लाख गाठींच्या दरम्यान होती. म्हणजेच बाजारातील कापूस आवक जवळपास निम्मी होती. त्यामुळं कापसाचे भाव टिकून होते. या काळात अनेकदा कापसाचे दरात चढ उतार झाले होते. त्यावेळी अॅग्रोवनने शेतकऱ्यांना टप्प्याटप्यानं कापूस विक्री करावी, असा सला दिला होता. अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळी कापूस विकलाही.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

सध्या कापूस बाजारात आवकेचा दबाव तर आहेच. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात दरात मोठी नरमाई आली. कापसाचे वायदे ७७ सेंटपर्यंत कमी झाले आहेत. म्हणजेच कापूस दरात क्विंटलमागं १२०० रुपयांपर्यंत नरमाई आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर नरमल्याचा परिणाम देशातील कापूस बाजारावरही झाला.

आवकेचा दबाव

देशातील शेतकरी यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाची मर्यादीत केली. त्यामुळं शेतकरी या हंगामात पूर्ण महिने टप्प्याटप्यानं कापूस विकतील असा अंदाज होता. पण एरवी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात येणारी परिस्थिती शेतकऱ्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यात आणली. शेतकरी जास्त जास्त कापूस मार्च आणि एप्रिल महिन्यात विकतील, असा अंदाज दिसत आहे. त्यामुळं उद्योगही दर वाढत नाहीत.

सध्याची स्थिती काय?

कापूस आवकेचा हा लाॅट येऊन गेल्यानंतर कापूस दरात सुधारणा होऊ शकते. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळत आहेत. कापसाची आवक जास्त वाढल्यास दरात आणखी नरमाई दिसू शकते. पण आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर सुधारतील, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Price : दुभत्या पशुधनांचे दर २५ टक्क्यांनी घटले

Ground Temperature : जमीन तापमानाचे संशोधन संस्थांना नाही गांभीर्य

FPC Capital : ‘एफपीसीं’ना भांडवल मिळण्याचा मार्ग मोकळा

Silver Rate : चांदीचा भाववाढीचा उच्चांक

Weather News : राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT