Cotton, Soybean Market: कापूस, सोयाबीन, तूर, हरभऱ्याचे बाजारभाव काय आहेत?

Anil Jadhao 

देशातील बाजारात सध्या कापासाची आक वाढली आहे. त्यामुळे कापसाला सध्या सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये भाव मिळत आहे.

सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. सध्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

देशात सध्या तुरीची तुटवडा आहे. त्यामुळे तुरीला ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव आहे.

हरभरा आवक आता हळूहळू वाढत आहे. पण पावसामुळे हरभरा पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे हरभरा दर तेजीत आले. सध्या हरभरा ४ हजार ६०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जातो.

राज्यातील बाजारावर कांदा आवकेचा दबाव आहे. त्यामुळं दरावर दबाव आहे. कांद्याचे सरासरी भाव सध्या ७०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

देशातील मक्याची काढणी पुढील महिन्यापासून वेगाने सुरु होईल. सध्या मक्याला २ हजार ते २३०० रुपये भाव आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतरही दरात जास्त नरमाई येणार नाही, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.