Cotton  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापसाचे वायदे वाढले; शेतकऱ्यांना कमीच भाव का? कापसाचा भाव कधीपासून वाढण्याची शक्यता आहे?

Cotton Rate : कापसाचे भाव बाजारातील आवक कमी झाल्यानंतर वाढू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Anil Jadhao 

Pune News : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्यानंतर देशातील वायद्यांमध्येही कापसाच्या भावात सुधारणा झाली. देशातील वायदे सायंकाळपर्यंत खंडीमागे ५०० रुपयांची वाढ झाली होती. पण बाजार समित्यांमध्ये मात्र भावपातळी दबावातच होती. पण कापसाचे भाव बाजारातील आवक कमी झाल्यानंतर वाढू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे मागील दोन आठवड्यांपासून सुधारताना दिसत आहे. कापसाच्या वायद्याने आजही कालच्या तुलनेत एक टक्क्याची वाढ झाली. आज दुपारपर्यंत कापूस वायदे ८५.४५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. कापूस वायद्यांनी मागील तीन महिन्यानंतर कापूस वायद्यांनी ८५ सेंटचा टप्पा पार केला. खंडीमध्ये हा भाव ५६ हजार रुपयांच्या दरम्यान होतो. जागतिक पातळीवर कापूस बाजारात मागणी तसेच गुंतवणूक वाढत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा दिसून येत आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा होत असल्याने देशातील बाजारातही कापसाचे वायदे वाढलेले दिसतात. कापसाचे जानेवारी डिलेव्हरीचे वायदे आज ३२० रुपयांनी वाढून ५६ हजार २०० रुपयांवर पोचले होते. तर मार्चचे वायद ५०० रुपयांनी वाढून ५८ हजारांवर पोचले होते. पण कालच्या तुलनेत आज चांगली सुधारणा वायद्यांमध्ये झाली. मार्चच्या वायद्यांनी गेल्या महिन्याभरानंतर ५८ हजारांचा टप्पा पुन्हा गाठला. 

देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे वाढले तरी बाजार समित्यांमधील भाव मात्र कायम आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणारा भाव वाढलेला नाही. आजही भावपातळी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे आजही शेतकऱ्यांची निराशा दिसून येते.

देशातील बाजारात आवकही जास्तच दिसते. बाजारातील आवक जवळपास दोन लाख गाठींच्या दरम्यान झाली होती. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ५७ हजार गाठींची आवक झाली. तर गुजरातमध्येही आवक ४५ हजार गाठींची झाली होती. 

भाव कमी असतानाही बाजारातील आवक जास्तच आहे. याचा दबाव आपल्याला बाजारावर दिसून येत आहे. दोन लाख गाठींची आवक ज्या हंगामात चांगले उत्पादन होते. त्या हंगामातील आवकेच्या बरोबर आहे. यंद तर उत्पादन घटले आहे. तरीही कापसाची आवक जास्तच आहे.

शेतकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास ६० टक्के कापूस विकला. आणखी काही दिवस आवक याचदरम्यान कायम राहू शकते, असा अंदाज आहे. तर फेब्रुवारीमध्ये कापसाची आवक कमी होत जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे कापसाच्या भावातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्याकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT