Team Agrowon
कापसाच्या वायद्यांमध्ये आज वाढ पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी ८५.५० सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता.
कालच्या तुलनेत आज कापसाचे भाव वाढले होते. त्यानंतर देशातील वायद्यांमध्येही सुधारणा झाली. एमसीएक्सवर वायदे ५०० रुपयांनी वाढून ५८ हजारांवर पोचले होते.
वायद्यांमध्ये वाढ झाली मात्र बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र दबावातच होती. कापसाचे भाव बाजार समित्यांमध्ये ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती.
बाजारातील आवक कमी झाल्यानंतर कापसाच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात सोयाबीन आजही दबावातच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव निचांकी पातळीवरून वाढत आहेत.
देशातील बाजारात मात्र सोयाबीन आजही ४ हजार ४०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारातील आवक सरासरी १ लाख ६० हजार क्विंटलच्या दरम्यान आहे.