Gautam Adani Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hindenburg Adani Research : हिंडेनबर्ग रिपोर्टमधून काय बोध घ्यायला हवा?

अदानी समूहाचे खरे रूप दाखवणारी हिंडेनबर्ग रिसर्च ही संस्था काय आहे? त्याचा संस्थापक नेथन अदर्सन कोण आहे? पण ही संस्था, हा रिपोर्ट बनवणारे लोक काही डाव्या विचारसरणीचे नाहीत, हे मुद्दामहून पुढे आणायची गरज आहे.

संजीव चांदोरकर

अदानी समूहाबद्दल (Adani Group) ‘हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) प्रसिद्ध केलेल्या अहवालाने अक्षरशः खळबळ माजली आहे. तो रिपोर्ट खूप व्हायरल झाला. सर्वसाधारणपणे डावी विचारधारा मानणाऱ्या व्यक्ती, गटांकडून “बघा आम्ही म्हणत नव्हतो (आय टोल्ड यू सो)” अशा प्रतिक्रिया येत आहेत.

अदानी समूहाचे खरे रूप दाखवणारी हिंडेनबर्ग रिसर्च ही संस्था काय आहे? त्याचा संस्थापक नेथन अदर्सन (Nathan Anderson) कोण आहे? पण ही संस्था, हा रिपोर्ट बनवणारे लोक काही डाव्या विचारसरणीचे नाहीत, हे मुद्दामहून पुढे आणायची गरज आहे.

नेथन अदर्सन नावाच्या व्यक्तीने स्थापन केलेली ही एक गुंतवणूक संस्था आहे आणि गुंतवणूक करण्याआधी केले जाणारे इक्विटी रिसर्च ते प्रसिद्ध करत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे अदानी रिपोर्ट.

वित्त भांडवलशाहीत स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स/ कमोडिटी/ करन्सी डेरिव्हेटिव्ह कमी किमतीत विकत घेऊन मग ते चढ्या किमतीत विकून गडगंज नफा कमावला जातो. पण स्टॉक एक्स्चेंजवर नफा कमवायचा फक्त हाच एक मार्ग नाहीये.

शेअर्स / कमोडिटी आधी जास्त भावात विकून नंतर त्यांचे भाव पडल्यावर ते विकत घेऊन, पोझिशन स्केअर ऑफ करून, नफा कमावला जातो. त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात. न्यू यॉर्क स्थित हिंडेनबर्ग ही शॉर्ट सेलिंग हेज फंड/ गुंतवणूक संस्था आहे.

वित्त बाजारातील शॉर्ट सेलिंगच्या अशा जागा हुडकून, त्यावर फॉरेन्सिक ऑडिट करून, अनेक मानवी तास खर्च करून (अदानी समूहाचा रिपोर्ट दोन वर्षे बनत होता), शोधपत्रकारिता करून हिंडनेबर्ग व्यवसाय करते. कोणताही पोकळ नैतिक भूमिका न घेता एक व्यवसाय म्हणून !

यासंदर्भात दोन निरीक्षणे नोंदवावीशी वाटतात ः

- जागतिक कॉर्पोरेट / वित्त भांडवलशाहीला क्लासिकल डाव्या वैचारिक भूमिका न घेता, प्रणालीमध्ये राहून त्या प्रणालीतील चुकीच्या गोष्टींची लक्तरे सार्वजनिक करणाऱ्या व्यक्ती, संस्था कार्यरत आहेत. अर्थात, ते संख्येने कमी आहेत.

डाव्या / जनकेंद्री चळवळीने त्यांचे महत्त्व जाणले पाहिजे. त्यांच्याशी किमान रॅपोर्ट ठेवला पाहिजे. ते डावी परिभाषा बोलत नाहीत म्हणून त्यांना राजकीय, वैचारिक अस्पर्श समजता कामा नये.

- अदानी समूहाच्या कंपन्या किंवा गौतम अदानी यांच्यावर हाजारो, लाखो कमेंट्स / मिम्स / कार्टून्स जे करू शकत नाही ते काम हिंडेनबर्गचा एक रिपोर्ट करू शकतो. याचे महत्त्व जाणले पाहिजे.

जागतिक वित्त भांडवलाची पोलखोल करणारे रिपोर्ट प्रायः त्या प्रणालीच्या राजकीय विरोधकांकडून, डाव्या कॅम्पमधून प्रसृत झाले पाहिजेत. सविस्तर रिसर्च रिपोर्ट म्हणतोय मी, नेहमीची भाषणे नव्हे.

त्यासाठी अशा संस्था स्थापाव्या लागतात. कॉर्पोरेट / वित्त भांडवलाचे क्लिष्ट विषय अभ्यासावे लागतात. त्यासाठी लागणारे फंड्स उभे करावे लागतात. किचकट काम आहे ते. त्यापेक्षा पोलिटिकली करेक्ट शेरेबाजी करत करणे सोपे असते.

असे काम इंग्रजी भाषेत काम करणाऱ्या मूठभर व्यक्ती आहे. त्या संस्थात्मक कामाला पर्याय होऊ शकत नाहीत हे नक्की.

आपल्यापाशी ‘लेफ्ट ऑफ सेंटर’ अवकाशात फारशा संस्था नाहीत; ज्या भारतातील कॉर्पोरेट / वित्त क्षेत्रात सुरू असणाऱ्या गोष्टींची शास्त्रीय, व्यावसायिक पद्धतीने कॉर्पोरेट, वित्त भांडवलाची, अकाउंटन्सी, स्टॉक मार्केटची परिभाषा वापरून त्यांची चिरफाड करतील, त्यांच्याच होम पिचवर जाऊन त्यांना चितपट करतील.

या कामांमधून नागरिक अधिक कन्व्हिन्स्ड होतील; शेरेबाजीतून कमी. आमच्या पिढीने केलेल्या चुका एकविसाव्या शतकातील तरुण पिढीने करू नयेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabbi Sowing 2025 : रब्बी हंगामातील पेरणी जोमात; मागील वर्षीच्या तुलनेत ४.५ टक्क्यांनी आघाडी

Farmer ID: अकोल्यातील ४१ हजार शेतकरी फार्मर आयडीपासून लांब

Pomegranate Farming: डाळिंब बागेत पीक संरक्षणासह मधमाशी संवर्धनासह भर

Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २.९१ लाख कोटींचे कर्ज प्रलंबित; लोकसभेत केंद्र सरकारने दिली आकडेवारी

Fish Farming: क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धनाला मोठी संधी 

SCROLL FOR NEXT