Bajara Variety: बाजरीच्या जैवसंपृक्त दोन वाणांची अधिकृत नोंदणी
Agri Research: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (वनामकृवि) छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित बाजरीच्या (जैवसंपृक्त) दोन संकरीत वाणांना भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क नोंदणी प्राधिकरणाकडून अधिकृत नोंदणी मिळाली आहे.