Akola News: महाबीज संशोधित संकरित ज्वारीचा महाबीज-७२७ हा वाण अखिल भारतीय समन्वीत संशोधन चाचणी प्रयोगात सलग तीनही वर्षांमध्ये सरस ठरला आहे. यामुळे आता महाराष्ट्र व मध्य प्रदेशात खरीप हंगामासाठी लागवडीस शिफारस करण्यात आली आहे. हा वाण राष्ट्रीय स्तरावर अधिसूचित करण्यात आल्याने महाबीजसाठी गौरवाची बाब मानली जात आहे. ..हा वाण ११४ ते ११७ दिवसांत परिपक्व होत असून, धान्य आणि उच्च प्रतीच्या कडब्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणारा मानला जातो..Rabi Jowar Management: रब्बी ज्वारीवरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन.याशिवाय, महाबीज-७२७ पोषण मूल्याने समृद्ध आहे. मर्यादित मनुष्यबळ व संसाधन असतानाही ही उपलब्धी महाबीजसाठी भूषणावह मानली जात आहे..Jowar Cold wave impact: शिरोळ तालुक्यात थंडीमुळे ज्वारी बियाणेच उगवेना.महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती बुवनेश्वरी एस, यांनी संशोधन व विकास विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल लहाने, उपमहाव्यवस्थापक श्री. गणेश डहाळे, जिल्हा व्यवस्थापक डॉ. निर्मल पारडे,.ज्वारी पैदासकार संतोष देशमुख व संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले. महाबीज संचालक वल्लभराव देशमुख आणि डॉ. रणजित सपकाळ यांनी महाबीज संशोधनामध्ये भरीव कार्य केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. महाबीज-७२७ वाणामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यासाठी आणि दर्जेदार धान्य मिळविण्यास मदत होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.