Water Chestnut Seasonal Crop Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Water Chestnut Price : शिंगाडा पोहोचला प्रति शेकडा ८० ते १०० रुपयांवर

Water Chestnut Market Rates : १४० रुपये मण (३०० नग) मोठे शिंगाडे व त्यात काही प्रमाणात लहान आकाराचे शिंगाडे असे मिळून सरासरी ३५० नग घाऊक विक्री दरम्यान व्यापाऱ्यांना दिले जातात. या शिंगाड्याची किरकोळ विक्री प्रति शेकडा ८० ते १०० रुपयांनी होत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Gondia News : पूर्व विदर्भातील तलावांच्या जिल्ह्यात शिंगाडा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदाच्या हंगामात संततधार पावसामुळे अनेक तलावातील शिंगाडा वेल वाहून गेले. परिणामी, गेल्या काही हंगामाच्या तुलनेत या वेळी दर चांगले असल्याचे शिंगाडा उत्पादक गणराज नान्हे यांनी सांगितले.

मालगुजारी तलाव त्यासोबतच जिल्हा परिषद आणि खासगी तलाव भाडेतत्त्वावर घेत पूर्व विदर्भातील अनेक गावांमध्ये शिंगाडा उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. या भागातील ढिवर समाज बांधवांचा हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. या वेळी पावसाची संततधार होती. परिणामी, अनेक तलावातील शिंगाडा वेल वाहून गेले.

त्याच्या परिणामी यंदा दरात काहीशी सुधारणा अनुभवण्यात आली आहे. गणराज नान्हे यांच्या माहितीनुसार, १४० रुपये मण (३०० नग) मोठे शिंगाडे व त्यात काही प्रमाणात लहान आकाराचे शिंगाडे असे मिळून सरासरी ३५० नग घाऊक विक्री दरम्यान व्यापाऱ्यांना दिले जातात. या शिंगाड्याची किरकोळ विक्री प्रति शेकडा ८० ते १०० रुपयांनी होत आहे.

शिंगाडा आवक अधिक झाल्यास त्याचा देखील दरावर परिणाम होतो. आरोग्यदायी म्हणून शिंगाडा ओळखला जात असला तरी त्याचा वापर आहारात जास्त होत नाही. त्यामुळे मागणी नसल्यास दर दबावात असतात. कधी कधी तर उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील शक्‍य होत नाही, अशी खंत गणराज यांनी व्यक्‍त केली. -

गणराज नान्हे यांनी ठाकूर टोला (जि. गोंदिया) परिसरातील पाच एकर तलाव पाच वर्षांकरिता एक लाख रुपयांत भाडेतत्त्वावर घेतला आहे. त्यामध्ये ते सामूहिकस्तरावर शिंगाडा उत्पादन घेतात. जठर शिंगाडा (बियाणे कामी) वापरतो. तो पाण्यात ठेवला जातो. त्याला अंकुर निघाला की तो पाण्यात रोवला जातो.

लागवडीच्यावेळी दोन ते तीन फूट पाणी राहते. मार्च, एप्रिल, मे महिन्यांत लागवड करतो. लवकर लागवड केल्यास उत्पादनही लवकर मिळण्यास सुरुवात होते. त्यानंतरच्या टप्प्यात खत, कीड-रोग नियंत्रणासाठी फवारणी (आठवड्यातून दोनदा), निंदण याप्रमाणे व्यवस्थापन करावे लागते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

Poultry Processing By Products: कुक्कुट प्रक्रिया उद्योगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धन

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

SCROLL FOR NEXT